दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 11 जुलैला राज्यात रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्ध समाजावर अत्याचार वाढत आहेत. त्याच्या निषेधार्थ येत्या 11 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
Republican party will agitation on July 11 in the state to protest against atrocities against Dalits
Republican party will agitation on July 11 in the state to protest against atrocities against Dalits

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्ध समाजावर अत्याचार वाढत आहेत. त्याच्या निषेधार्थ येत्या 11 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

लॉकडाउनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाले आहेत; त्यांची घरे जाळले आहेत. दलित, बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडले आहेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.

बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या 11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे, असे आठवले म्हणाले. 

हे निषेध आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे, असे आठवले यांनी सांगितले आहे. 

राज्यात दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रश्नावर निषेध आंदोलन करण्यासाठी 11 जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे. 
11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी 11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते. तसेच, या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन करते. त्यामुळे 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आठवले यांनी दिली आहे. 
 

पक्षासाठी नोकरी सोडणाऱ्या पप्पू कागदेंना आठवले न्याय कधी देणार? 

बीड : ओठावर मिशाही नसताना दलित पॅंथरचा कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली आणि मग रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शाखाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशी यशस्वी वाटचाल केली. विशेष म्हणजे, तत्पूर्वी त्यांची इंडियन नेव्हीत शिपाई पदावरही निवड झाली होती. मात्र, पॅंथर चळवळीत मन रमलेल्या पप्पू कागदेंनी पॅंथर चळवळीचा निळा झेंडा खांद्यावरून पडूच दिला नाही. त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याने मागच्या 22 वर्षांपासून रिपाइंचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे. दलित चळवळीत अग्रेसर असलेल्या पप्पू कागदे यांचा इतर समाजाशी सुसंवाद आहे. 

कागदे हे शिक्षित कुटूंबातून असून त्यांचे वडील परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीस होते. तेही कट्टर पॅंथर चळवळीतले. त्यामुळे चळवळीचे बाळकडू पप्पू कागदे यांना घरातूनच मिळाले. उच्च माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच रामदास आठवले यांच्या आकर्षणापोटी ते दलित चळवळीकडे ओढले गेले. वयाच्या 17 व्या वर्षी ते भीमराजनगर शाखेचे अध्यक्ष झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com