republican leader ramdas athwale warns government over reservation issue | Sarkarnama

रामदास आठवले म्हणतात, वेळ आल्यास रस्त्यावर उतरू...

सरकारमाना ब्युरो
मंगळवार, 21 जुलै 2020

राजकीय आरक्षण हा दलितांचा घटनात्मक अधिकार असून, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दलितांचे राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मुंबई :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित-आदिवासींना सामाजिक व शैक्षणिक आरक्षणासोबत  राजकीय आरक्षण ही संविधानात अंतर्भूत केले. त्यामुळे राजकीय आरक्षण हा दलितांचा  घटनात्मक अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दलितांचे राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. 

राजकीय आरक्षण नको, अशी भूमिका काही जण मांडत आहेत. राजकीय आरक्षण हटविल्यास दलित आदिवासींचे फार मोठे नुकसान होईल. आता ज्या प्रमाणात दलित आदिवासींचे प्रतिनिधी संसदेत निवडून जातात त्यापेक्षा अत्यंत कमी प्रतिनिधी निवडून येतील. याचबरोबर दलित, आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडता येणार नाही. तसेच, सत्तेच्या माध्यमातून समाजाला मदतही मिळवून देता येणार नाही. त्यामुळे राजकीय आरक्षण हटविले तर दलित आदिवासी समाजाचे मोठे नुकसान होईल, असे रामदास आठवले म्हणाले.

दलित आदिवासींसाठी असणारे राजकीय आरक्षण कुणाला नको हवे असेल तर त्याने त्याच्या पुरते ते नाकरावे. ज्याला नको असेल त्याने राजकीय आरक्षण घेऊ नये मात्र, दलित-आदिवासींसाठीचे राजकीय आरक्षण बंद करण्याची चुकीची मागणी कोणी करू ,असेही आठवले यांनी नमूद केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि नोकरी मध्ये अनुसूचित जातीसाठी 15 टक्के तसेच अनुसूचित जमातीसाठी 7. 50 टक्के आरक्षण घटनेच्या कलम 16 प्रमाणे दिले आहे. तसेच, राजकीय आरक्षण ह दलितांचा घटनात्मक अधिकार आहे.तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

वाचा : खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात, शरद पवारांनी इगो बाजूला ठेऊन मोदींची मदत घ्यावी !

मुंबई : मंदिराचे बांधकाम आणि कोरोना संसर्ग या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाजपकडून टीका सुरू आहे. याचबरोबर पवार यांना भाजप नेते लक्ष्य करु लागले आहेत. आता उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी पवारांवर टीका केली आहे. राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे. शरद पवारांच्या विधानामुळे मी आश्चर्यचकीत झालो आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोनाही जाईल व 2024 च्या निवडणुकीत विरोधकांच्या जागाही कमी होतील, याची जाणीव पवारांना आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी पवार व राज्य सरकारमधील अन्य धुरीणांनी आपला इगो बाजूला ठेऊन मोदी यांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख