आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींचा अर्ज - Republic TV Editor Arnab Goswami Files Fresh Application in Mumbai High Court | Politics Marathi News - Sarkarnama

आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींचा अर्ज

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 डिसेंबर 2020

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई  : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याआधी गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी दोन स्वतंत्र अर्जाद्वारे केली आहे; मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जामुळे गोस्वामी यांनी पुन्हा नवीन अर्ज केला. 

अलिबाग न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊ नये आणि संपूर्ण तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय हा तपास सुरू झाला आहे, असा दावा गोस्वामी यांनी केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या १९१४ पानी आरोपपत्रात एकूण ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर खटल्याची कारवाई सुरू होऊ शकेल; मात्र गोस्वामी यांच्या अर्जावर उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख