राऊत - फडणवीसांमधली भेट राजकीयच; चंद्रकांत दादांचा दावा - Raut Fadanavis Meeting was Political Claims Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत - फडणवीसांमधली भेट राजकीयच; चंद्रकांत दादांचा दावा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

राज्यात मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते. मात्र, सध्या कुठल्याही पक्षाला ती नको आहे. भाजपलाही मुदतपूर्व निवडणूक नको आहे. मात्र, हे सरकार फारकाळ टिकणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे, असेही पाटील म्हणाले.

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची नुकतीच झालेली भेट ही राजकीयच होती, असा ठाम दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.  राऊत-फडणवीस भेट जरी राजकीय असली तरीही या भेटीतून फारसे काही निष्पन्न झालं नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. फडणवीस आणि राऊत यांची हाॅटेल ग्रॅड हयातमध्ये दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ही भेट झाली. या वेळी भाजपकडून किंवा सेनेकडून इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते. या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या.  ही भेट केवळ मुलाखती संदर्भात होती, असा दावा संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण आता खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच याबाबत वेगळी माहिती दिली आहे. 

राज्यात मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते. मात्र, सध्या कुठल्याही पक्षाला ती नको आहे. भाजपलाही मुदतपूर्व निवडणूक नको आहे. मात्र, हे सरकार फारकाळ टिकणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे, असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी राऊत-फडणवीस यांची भेट आणि त्यानंतर मुदतपूर्व निवडणूक अशा विषयांवर भाष्य केल्याने महाविकास आघाडी अस्थिर करण्याचे काही प्रयत्न सुरु आहेत काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख