Ramdas Athavale Says NCP and Congress Running The Government | Sarkarnama

गाडीचे फक्त स्टेअरिंगच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हाती : राज्यमंत्री रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 जुलै 2020

महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे तीन पक्षाचे तिघाडी सरकार अस्तित्वात आहे. मात्र, कोणत्याही पातळीवर हे महाविकास आघाडी सरकार सक्षम ठरले नसून तिघाडी चे बिघाडी झालेले सरकार ठरले आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे

मुंबई :  राज्य सरकारच्या तीन चाकी गाडीचे फक्त स्टेअरिंगच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचीच चालते. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून  स्वतःच्या मना प्रमाणे  तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत. त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी शिवाय उद्धव ठाकरे सरकार ची तीन चाकी गाडी बंद पडू शकते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले केले आहे.

आठवले म्हणाले, "महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे तीन पक्षाचे तिघाडी सरकार अस्तित्वात आहे. मात्र, कोणत्याही पातळीवर हे महाविकास आघाडी सरकार सक्षम ठरले नसून तिघाडी चे बिघाडी झालेले सरकार ठरले आहे. लॉकडाऊन च्या काळातही दलितांवर राज्यात अत्याचार वाढते राहिले आहेत. कोरोनाचे वाढते संकट रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. कोणताही निर्णय तीन पक्षाचे सरकार एकमताने घेऊ शकत नाही,''

"मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आपल्या मनाप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन काम करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी शी युती करून वाट चुकलेत. ते आमच्या सोबत असायला हवे होते. मुख्यमंत्री म्हणून ते तीन चाकी सरकार चे फक्त स्टेयरिंगधारी चालक आहेत. खरे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस ठरत आहेत,'' असेही आठवले म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख