..म्हणून राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट

सत्ताधाऱ्यांची माणसे दिवसाढवळ्या हत्या करत आहेत.सुरज परमार यांच्या हत्येत देखील नाजीम मुल्ला याचे नाव आले आहे. राज्य सरकार काय करताय ते मी पाहणार आहे? अन्यथा लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
Sharad Pawar - Raj Thackeray
Sharad Pawar - Raj Thackeray

मुंबई : आमच्या पक्षाच्या जमिल शेखची हत्या झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशला जाऊन महाराष्ट्र पोलिसांनी शोध घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP नाजीम मुल्ला याचे नाव या खुनाच्या प्रकरणात आले आहे. या हत्येसाठी त्याला दोन लाख रुपये मिळाले होते सत्ताधाऱ्यांची माणसे दिवसाढवळ्या हत्या करत आहेत. सुरज परमार यांच्या हत्येत देखील नाजीम मुल्ला याचे नाव आले आहे. राज्य सरकार काय करताय ते मी पाहणार आहे? अन्यथा लवकरच शरद पवार Sharad Pawar यांची भेट घेणार आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे सांगितले.Raj Thackeray Says he will meet NCP Chief Sharad Pawar Soon

राज्यात लावलेल्या मिनी लाॅकडाऊन वरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे MNS अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारच्या त्रुटी दाखवून देत सरकारला चिमटेही काढले. ते म्हणाले, राज्यात बदल्यांचे बाजार होतात असा आरोप करुन ते म्हणाले, "४० दिवसात २ राजीनामे बघायला मिळतात. पण ते मंत्री देखील असे वागत आहेत ना म्हणून असे हे राजीनामे बघायला मिळत आहेत. सरकार म्हणजे इमारत नाही खालचे पिलर काढले की कोसळायला. असे कधी सरकार कोसळत नाही. अनिल देशमुख Anil Deshmukh हा महत्त्वाचा विषय नाही. अंबानी Mukesh Ambani यांच्या घराच्या खाली गाडी कुणी ठेवली हा विषय आहे. पोलिसांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही गाडी ठेवली. कुणीतरी सांगितल्याशिवाय पोलिस असं करणार नाहीत," 

सुशांतसिंह राजपूत Sushantsinh Rajput केसमध्ये त्याने आत्महत्या केली आणि जेलमध्ये गेला अर्णब. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, असा खोचक सवालही त्यांनी केला."काल मी मुख्यमंत्र्याना कॉल केला होता. लोकडाऊन बाबत भेटीची विनंती केली होती. पण त्यांच्या आजूबाजूला खूप लोक पॉझिटिव्ह आहेत. म्हणून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. काल आमचे झूम वर काय बोलणे झाले ते सांगत आहे, असे म्हणत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. Raj Thackeray Says he will meet NCP Chief Sharad Pawar Soon

लाॅकडाऊन बाबत बोलताना ते म्हणाले, "लोकडाऊन Lock Down झाला तेव्हा तो बऱ्यापैकी पाळला गेला, पुन्हा सर्वजण लोकडाऊन पाळतील. पेशंट ची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र Maharashtra औद्योगिक राज्य आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. पश्चिम बंगालमध्ये West Bengal निवडणूक आहे.  बाहेर कोरोना नाही का हा प्रश्न आहे. बाहेरून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोक येतात. बाहेर राज्यात आकडे मोजले जात नाहीत. तिथे न मोजल्यामुळे आकडे कळत नाहीत,"असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com