कामाला लागा : राज्यातील 95 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू

राज्यातील 95 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच 31 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
Preparations are underway for 95 Municipal Council and Nagar Panchayat elections in the state
Preparations are underway for 95 Municipal Council and Nagar Panchayat elections in the state

मुंबई : राज्यातील 95 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच 31 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी दिली. या मतदार याद्यांवर 22 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 

या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या याद्या प्रभागनिहाय केल्यानंतर 15 तारखेला प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. तर 1 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 मार्चला प्रसिध्द होतील, असे मदान यांनी सांगितले. 

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करता येणार नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या दुरूस्त्या करण्यात येणार असल्याचेही मदान यांनी स्पष्ट केले.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे -

ठाणे- अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी, पुणे- राजगुरूनगर, चाकण, नाशिक- चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी.

धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगाव- भडगाव, वरणगाव अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ.

उस्मानाबाद- वाशी, नांदेड- भोकर, हिमायतनगर, नायगाव, हिंगोली- सेनगाव, औंढा- नागनाथ, अमरावती- भारकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा, नागपूर- मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर.

भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com