उर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोना - Power Minister Nitin Raut Found Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

उर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोना

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

राज्याचे उर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. लक्षणे नसल्याने तुर्तास त्यांना घरातच विलिगीकरणात ठेवण्यात आले असून, कदाचित आज सायंकाळपर्यंत रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. 

मुंबई : राज्याचे उर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. लक्षणे नसल्याने तुर्तास त्यांना घरातच विलिगीकरणात ठेवण्यात आले असून, कदाचित आज सायंकाळपर्यंत रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्रीत अनेक आमदार व काही मंत्री आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गडकरी हे  सोमवारी (ता. 14) संसद अधिवेशनाला काही काळ उपस्थित होते आणि पहिल्याच रांगेत बसले होते. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. 

दरम्यान, राज्यात काल 24 हजार 619 कोरोनाबाधितांची भर पडली असून, बाधितांचा एकूण आकडा 11,45,840 वर पोचला आहे. दुसऱ्या दिवशीही दिवसभरात तब्बल 468 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 30,409 वर पोचला आहे. दिवसभरात 19,522 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

काल नोंद झालेल्या 468 मृत्यूंपैकी 286 मृत्यू मागील 48 तासांतील तर 77 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज एकूण 3,01,752 सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज 19,522 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 8,12,354 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.90 टक्के आहे. आज राज्यात नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे परिमंडळ 92, पुणे 81, नाशिक 59, कोल्हापूर 67, औरंगाबाद 15, लातूर मंडळ 34, अकोला मंडळ 7, नागपूर 41 व इतर राज्य 2 येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.74 टक्के आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख