भिवंडीत कोरोना केंद्राच्या इमारतीवरून उडी मारुन रुग्णाची आत्महत्या 

मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील रांजणोली बायपास नाका येथील आमंत्रण कोरोना सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका ४३ वर्षीय कोरोनाच्या रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १९ जुलै) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Patient commits suicide by jumping from Corona Center building in Bhiwandi :
Patient commits suicide by jumping from Corona Center building in Bhiwandi :

भिवंडी : मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील रांजणोली बायपास नाका येथील आमंत्रण कोरोना सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका ४३ वर्षीय कोरोनाच्या रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १९ जुलै) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

संबंधित कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण डोंबिवली येथील राहणारा आहे. त्याला उपचारासाठी शुक्रवारी (ता. १७ जुलै) दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याने मानसिक धक्क्यातून इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली.

या वेळी त्याच्या डोक्याला, छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या वेळी कर्तव्यावर हजर असलेल्या कोनगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ऑरेंज हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. 

कोनगाव पोलिस ठाण्यात या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश काटकर पुढील तपास करीत आहे. याच कोरोना सेंटरमधून या अगोदर मुंबईच्या एका कोरोना रुग्णाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. खुनाच्या आरोपातील सजा भोगणाऱ्या दुसऱ्या कोरोना बाधित रुग्णाने पलायन केले आहे. त्यामुळे भिवंडीतील आमंत्रण कोरोना सेंटरची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे असल्याचे उघड झाले आहे. 

भिवंडीत ११५ प्रतिबंधित क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन कायम 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार भिवंडी शहरात ता. १९ जुलैपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर रविवारी (ता. १९ जुलै) सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी शहरातील ११५ प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात ३१ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन घोषित केला केला आहे, असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊन फक्त प्रतिबंधित क्षेत्रासाठीच लागू असणार आहे. 

भिवंडी शहरातील इतर भागामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी सम, विषम तारखेचे बंधन घालण्यात आले आहे. व्यापाऱ्यांसह नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. आशिया यांनी दिली आहे. आपल्या आदेशामध्ये त्यांनी तसे नमूद केले आहे. 

दरम्यान शहरातील मॉल व मार्केट, कॉम्प्लेक्स बंदच राहणार आहेत. बाजारपेठ व्यावसायिकांनी या लाँकडाउन बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Edited By : Vijay Dudhale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com