पार्थ पवार यांनी व्यक्त केली सुप्रिया सुळेंकडे दिलगिरी 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीररित्या फटकारले होते. त्यानंतर त्यांनी आज सायंकाळी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी धाव घेतली. या वेळी त्यांनी अजाणतेपणी चूक झाल्याची दिलगिरी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.
Partha Pawar expressed apology to Supriya Sule
Partha Pawar expressed apology to Supriya Sule

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीररित्या फटकारले होते. त्यानंतर त्यांनी आज सायंकाळी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी धाव घेतली. या वेळी त्यांनी अजाणतेपणी चूक झाल्याची दिलगिरी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. पार्थ यांनी शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येते. 

सीबीआय प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारले आहे. पार्थ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगितले होते. 

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांची आज मंत्रालयात भेट घेतली, ही भेट देखील शासकीय कामकाजासंदर्भात होती, असे सांगण्यात आले. 

गेल्या दोन दिवसांतील या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पार्थ पवार यांनी आज सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते. या वेळी कोणतीही भूमिका आणि वक्तव्य करण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. 

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रावादीच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. बुधवारी संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानण्यात येते. 
 

पार्थ पवार नाराज आहेत, हे कुणी सांगितले? शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना नातवांना बोलण्याचे अधिकार आहेत. कुटुंबातील कुणी वरिष्ठ, वडीलधारी व्यक्ती बोलले, तर आपण नाराज होतो का? 
-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com