पारनेरचा विषय स्थानिक पातळीवरील; संजय राऊतांनी टाकला अखेर पडदा

पारनेरमधील नगरसेवकांच्या पळवापळवीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून पडदा टाकण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही हा विषय स्थानिक पातळीवरीलअसल्याचे म्हटले आहे.
parner politics is local issue says shivsena leader sanjay raut
parner politics is local issue says shivsena leader sanjay raut

मुंबई : पारनेरमध्ये  झालेल्या नगरसेवकांच्या पळवापळवीमुळे राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्विरोध समोर आला होता. सरकारमधील घटक पक्षाच्या विसंवादाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनीही टीका केली होती. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अखेर पडदा टाकला आहे. पारनेरचा विषय हा स्थानिक पातळीवरील होता, त्याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही, असे राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आज सांगितले. 

गृह मंत्रालयाने पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. गृहखाते राष्ट्रवादीकडे असून, मुख्यमंत्र्यांनी थेट बदल्या रद्द केल्याने सरकारमधील अंतर्विरोधाचा मुद्दा समोर आला होता. यावर राज्यातील सरकारमध्ये संवादाचा अभाव असून, योग्य पद्धतीने समन्वय नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याचा समाचारही राऊत यांनी घेतला.

ते म्हणाले की, पारनेरचा विषय हा स्थानिक पातळीवरील आहे. आम्हाला राज्य कसे चालवायचे हे माहिती आहे. सरकारमधील प्रत्येक निर्णय हा हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच घेतला जातो. कोरोनाच्या संकटामुळे काही प्रमाणात संवाद कमी झाला असेल. याचा अर्थ असा नाही की सरकारमध्ये विसंवाद आहे.  राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपली 5 वर्षे पूर्ण करेल. याबद्दल कोणी शंका उपस्थित करण्याची गरज नाही.  
पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये कोणतेही राजकारण झालेले नाही. अधिकारी बदलले म्हणून कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये. लोकशाहीत वेगवेगळी मते असणे हे  जिवंतपणाचे लक्षण आहे. माध्यमे सरकारमध्ये खटका उडाला असा शब्दप्रयोग वापरत आहेत. तो मला मान्य नाही. तुम्ही म्हणत बसाल सरकारमध्ये खटके उडाले आणि सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असेल. सरकारमध्ये सर्व निर्णय सहमतीनेच होतात, असे राऊत यांनी सांगितले.  

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राऊत यांनी मुलाखत घेतली असून, याविषयी बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांची मी प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. त्यांची एवढी प्रदीर्घ मुलाखत कोणी घेतली असे मला वाटत नाही. त्यांच्याकडील ज्ञानाचे भांडार सगळ्यांपर्यंत पोचायला हवे. 

कोरोनावरील लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रकार करीत आहे. कोरोना रोखण्यासाठी अपयश आल्याने चीनचे निमित्त पुढे करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. मला कोणाची पर्वा नाही, मला जे वाटते दिसते त्याबद्दल मी बोलतो. परीक्षेच्या मुद्द्यावरुन विद्यार्थी  संघटना बोलताहेत. त्यांना हा विषय माहिती असल्याने त्यांनीच याबाबत बोलणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com