परमबीर सिंग यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव : सचिन सावंतांचा आरोप

परमबीर सिंग यांचे पत्र, त्या आधीच्या घटना या सगळ्या भाजपच्या स्क्रिप्टेड गोष्टी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. परमबीर सिंग यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असू शकतो, असाही संशय त्यांनी व्यक्त केला.
Parambir Singh - Sachin Sawant
Parambir Singh - Sachin Sawant

मुंबई : परमबीर सिंग यांचे पत्र, त्या आधीच्या घटना या सगळ्या भाजपच्या स्क्रिप्टेड गोष्टी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. परमबीर सिंग यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असू शकतो, असाही संशय त्यांनी व्यक्त केला. (Parambir Singh Under pressure Claims Congress Spokesperson Sachin Sawant)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र परमबीर सिंग (Parambir Singh)यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. भाजप व अन्य पक्षही याबाबत आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत यांनी पक्षाची भूमीका मांडली. ते म्हणाले, ''जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण केले जात आहे. जिथे जिथे विरोधी पक्षांचे सरकार आहे तिथे हे वातावरण तयार केले जात आहे. विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजपची कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते. कर्नाटक, राजस्थानमध्ये हे आपण पाहिले. साम, दाम, दंड, भेद वापरुन सत्ता मिळवायची हा भाजपचा प्रयत्न असतो. यासाठी दिल्लीच्या यंत्रणांचा वापर केला जातो,''

सावंत पुढे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार वर्षभर असे अत्याचार सहन करते आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासारख्या प्रकरणांचा राजकीय अजेंड्यासाठी वापर केला जात आहे. एका अधिकाऱ्याने पत्र लिहिले. मात्र, माध्यमांनी तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपच्या अजेंड्यावर मिडियाचा एक भाग चालतो आहे. प्रशासकीय यंत्रणांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे. हे जे वातावरण तयार केले जातेय की कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, हा भाजपचा डाव आहे,''

"गुजरातमध्ये २०१२ मध्ये हेच झाले होते. तत्कालिन पोलिस महासंचालक वंझारा यांनी अमित शहांवर आरोप केले होते. इथल्या पेक्षा गंभीर आरोप होते. त्यावेळी अमित शहांनी राजीनामा दिला होता का?  याच वंझारा यांना नंतर परत घेतले. संजीव भट्ट यांनी नरेंद्र मोदींवरही केले होते. आज महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदार आरोप केले जात आहेत. पण भाजपचा स्वतःसाठीचा मापदंड वेगळा आहे. इतरांसाठी वेगळा आहे,'' असेही सावंत म्हणाले.

परमबीर सिंग यांच्या पत्राबाबत सावंत म्हणाले, "पत्र लिहिणारी व्यक्ती आधीच अडचणीत आहे. त्यांच्यावर बदलीची कारवाई झाली, त्यानंतर ते पत्र लिहितात. ही मानसिकता समजावून घेतली पाहिजे.  डान्सबारमधून पैसे आणण्याबाबतचा आरोप केला गेला. मात्र गेले वर्षभर डान्स बार बंदच होते. सचीन वाझे फेब्रुवारीत गृहमंत्र्यांना भेटले असाही आरोप केला गेला. त्यावेळी गृहमंत्र्यांना कोरोना झाला होता. ते आॅनलाईन मिटिंग घेत होते. परमबीर सिंग यांना हे आधी माहित होते तर ते त्यांनी त्यावेळी जनतेसमोर हे का आणले नाही, मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिले नाही? तुमच्यावर कारवाई होणार हे माहित होते. त्यामुळे तुम्ही एसएमएसमधून पुरावे तयार केलेत,'' (Parambir Singh Under pressure Claims Congress Spokesperson Sachin Sawant)

''एटीएसने वाझेंची कस्टडी मागितली. लगेच एनआयएने तपासाचा ताबा घेतला. असे का, याचे उत्तर अपेक्षित आहे. तिहार तुरुंगात मोबाईल कसे पोहोचले याचेही उत्तर मिळालेले नाही. या स्क्रिप्टेड गोष्टी चालल्या आहेत.  डेलकर तपास दादरा-नगर-हवेलीचे पोलिस करतील असे परमबीरसिंग यांचे म्हणणे होते. कारण या प्रकरणाशी भाजपचा संबंध आहे. \परमबीर यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असू शकतो. महाराष्ट्र सरकारने दबावाखाली येऊ नये,'' असेही सावंत म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com