Orientation of Yoga Needed to Keep Body and Mind Healthy, Stress Free: Pankaja Munde | Sarkarnama

तन मन निरोगी, तणावमुक्त ठेवण्याकरीता योगाच्या प्राच्यविद्येची गरज : पंकजा मुंडे 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

21 जून हा योगदिन. या दिवशी भाजपचे सामान्य कार्यकर्ते ते केंद्रीय मंत्र्यापासून योगदिन साजरा करतात.

पुणे : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा योगा करून जागतिक योगदिन साजरा केला. . 

21 जून हा योगदिन. या दिवशी भाजपचे सामान्य कार्यकर्ते ते केंद्रीय मंत्र्यापासून योगदिन साजरा करतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही योगासने करून जनतेला शुभेच्छा देताना तंदुरूस्त राहण्याचे आवाहन केले.  आता पंकजा मुंडे यांनी वेगळ्या लूकमधील फोटा ट्विटवर टाकले आहे. या फोटाला त्यांच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. 

आजच्या लॉकडाऊन काळात आपले तन मन निरोगी आणि तणावमुक्त ठेवण्याकरीता योगाच्या प्राच्यविद्येची गरज भारतातच नव्हे तर समस्त जगात यापुर्वीपेक्षाही अधिक प्रमाणात आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा असे मुंडे यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

रावसाहेब दानवेंची योग साधना 

 राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नियमित व्यायामाशिवाय आज जागतिक योगदिनाच्या निमित्ताने कुटुंबासह योग साधना केली. राजकारणातील चढउतार असो की, कौटुंबिक ताण तणाव यावर व्यायाम आणि योग हा सर्वात उत्तम उपाय समजला जातो.

योगाचे महत्व माहित असल्यानेच दानवे यांनी आपल्या बंगल्यांच्या हिरवळीवर ९ वर्षीय बालयोगी संतोष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना केली. यावेळी त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना सहभागी करून घेत त्यांनाही योगा करायला लावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख