राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा पोचला 78 हजारांवर 

राज्यभरात गुरुवारी 123 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 2,710 झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 33 हजार 681 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यात गुरुवारच्या 1 हजार 352 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण 41 हजार 393 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.
The number of corona patients in the state reached 78 thousand
The number of corona patients in the state reached 78 thousand

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 793 वर पोचली आहे. गुरुवारी (ता. 4) 2 हजार 933 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यभरात गुरुवारी 123 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 2,710 झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 33 हजार 681 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यात गुरुवारच्या 1 हजार 352 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण 41 हजार 393 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात गुरुवारी 123 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई 48, नवी मुंबई 6, ठाणे 8, रायगड 3, वसई विरार 1, पालघर 1, पनवेल 1, जळगाव 21, नाशिक 3, धुळे 1, पुणे 9, सोलापूर 7, औरंगाबाद 5, जालना 1, परभणी 2, लातूर 1, उस्मानाबाद 1, नांदेड 1, वाशीम 2, यवतमाळ 1 मृत्यूचा समावेश आहे. गुरुवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 85 पुरुष, तर 38 महिला आहेत. 123 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 71 रुग्ण आहेत, तर 44 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. आठ जण 40 वर्षांखालील आहेत. 

या 123 रुग्णांपैकी 92 जणांमध्ये (75 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2 हजार 710 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 30 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत, तर उर्वरित मृत्यू 30 एप्रिल ते 1 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 92 मृत्यूंपैकी मुंबई 40, जळगाव 16, ठाणे 8, सोलापूर 6 नवी मुंबई 5, रायगड 3, परभणी 2, नाशिक 2, वाशीम 2, औरंगाबाद 2, पनवेल 1, पालघर 1, वसई विरार 1, उस्मानाबाद 1, धुळे 1, नांदेड 1, यवतमाळ 1 मृत्यू नोंद झाले आहेत. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3804 झोन क्रियाशील असून गुरुवारी एकूण 19 हजार 132 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 72.37 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. 

साडेपाच लाख जण क्वारंटाइन 

सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 303 लोक होम क्वारंटाइन आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये 73 हजार 049 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com