The number of corona patients in Mumbai is around 40,000
The number of corona patients in Mumbai is around 40,000

चिंताजनक ः मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांच्या उंबरठ्यावर 

मुंबईत दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली येत नाही. रविवारीही (ता. 31 मे) 1244 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 38 हजार 464 वर पोचली आहे.

मुंबई : मुंबईत दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली येत नाही. रविवारीही (ता. 31 मे) 1244 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 38 हजार 464 वर पोचली आहे. रविवारी दिवसभरात 52 जणांचा मृत्यू झाला आहे. आता मृतांची एकूण संख्या 1279 झाली आहे. 

रविवारी नोंद झालेल्या 52 मृत्यूंपैकी 28 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 23 पुरुष, तर 29 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांवर वय 40 च्या खाली होते, तर 22 रुग्ण 60 वर्षावरील होते. 28 रुग्ण 40 ते 60 वर्ष वयोगटातील होते. 

430 रुग्ण बरे होऊन घरी 

एकीकडे मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले, तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. रविवारी 430 रुग्ण बरे झाले असून यशस्वी उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची एकूण संख्या 16 हजार 794 झाली आहे. संशयितांच्या संख्येतही वाढ झाली असून रविवारी एकूण 826 संशयितांची नव्याने भर पडल्याने आतापर्यंत 31 हजार 069 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

राज्यात 2487 नवीन रुग्णांची भर 

दरम्यान, रविवारी राज्यात नव्याने 2 हजार 487 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 67 हजार 655 झाली आहे. रविवारी दिवसभरात राज्यात 89 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 2 हजार 286 वर पोचला आहे. रविवारी (ता. 31) 1248 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण 29 हजार 329 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्यात रविवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 52, नवी मुंबईत 9, ठाण्यात 5, कल्याण-डोंबवलीतील 4, मालेगाव 6, पुणे 9, सोलापूर 2, उस्मानाबाद 1 आणि यवतमाळमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3 हजार 157 झोन क्रियाशील असून रविवारी एकूण 18 हजार 490 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 70.14 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

साडेपाच लाखांहून जास्त लोक होम क्वारंटाईन 

सध्या राज्यात 5,58,100 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72,704 खाटा उपलब्ध असून सध्या 34,480 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

89 मृतांपैकी 56 जणांना अतिजोखमीचे आजार 

रविवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष, तर 43 महिला असून 89 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 47 रुग्ण आहेत. 35 रुग्ण हे 40 ते 59 वर्ष या वयोगटातील, तर 7 जण 40 वर्षांखालील आहेत. या 89 रुग्णांपैकी 56 जणांमध्ये (63टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. रविवारी नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 39 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत, तर उर्वरित मृत्यू हे 27 एप्रिल ते 27 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 50 मृत्यूंपैकी मुंबई 27, नवी मुंबई 9, मालेगाव 6 , कल्याण डोंबिवली 4, ठाणे 3, सोलापूर 1 असे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com