ईडी कार्यालयावरील सेनेच्या मोर्चाची नितेश राणेंनी उडवली खिल्ली - Nitesh Rane Ridicules Shvisena Morcha on ED Office | Politics Marathi News - Sarkarnama

ईडी कार्यालयावरील सेनेच्या मोर्चाची नितेश राणेंनी उडवली खिल्ली

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

ईडी कार्यालयावर शिवसेना काढणार असलेल्या मोर्चाची भाजप आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. याबाबतचे एक ट्वीट त्यांनी केले आहे. 

मुंबई : ईडी कार्यालयावर शिवसेना काढणार असलेल्या मोर्चाची भाजप आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. याबाबतचे एक ट्वीट त्यांनी केले आहे. 

शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे.. 
हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ..
हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही..
हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही..
पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!
महाराष्ट्र धर्म?...

असे ट्वीट राणे यांनी केले आहे. 

काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे लागला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांना तर नोटिस बजावण्यात आली. टाॅप्स सिक्युरिटी प्रकरणात सरनाईक कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडीच्या चौकशीची नोटीस बजावण्यात आली. हे सगळे सूडभावनेतून भाजप करत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनीही यावर टीका केली आहे. 

संबंधित लेख