नीतेश राणे म्हणतात..'यासाठी' हवे फडणवीस सरकार - Nitesh Rane Praises Karnataka Government Decision about Maratha Community | Politics Marathi News - Sarkarnama

नीतेश राणे म्हणतात..'यासाठी' हवे फडणवीस सरकार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

कर्नाटकातील मराठा समाजाला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. राज्यात 'मराठा विकास प्राधिकरण' स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यावरुन आमदार नीतेश राणे यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे

मुंबई : कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!!! असे सांगत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नीतेश व निलेश राणे महाविकास आघाडीवर व विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने शाब्दिक वार करत आहेत. मंदीर उघडण्याच्या निर्णयावरुनही राणे यांनी उद्धव यांची खिल्ली उडवली होती. भाजप नी सरकारचे डोळे उघडले.. म्हणुनच मंदिराचे दारे उघडले!! असे म्हणत त्यांनी सरकारला चिमटा काढला होता. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. त्यावरुन राणे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. 

कर्नाटकातील मराठा समाजाला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. राज्यात 'मराठा विकास प्राधिकरण' स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी ५० कोटी रुपये अनुदान राखीव ठेवले जाणार आहे. कर्नाटक राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकातही मराठा समाज असून भारतीय जनता पक्षाला नेहमीच मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे. त्यामुळे नेहमीच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा समाजाच्या विकासावर भर दिला आहे.

मराठा समाजाला खूश करण्यासाठी या पूर्वीही राज्यात शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेत समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यावरुन नीतेश राणे यांनी महाराष्ट्र शासनाला चिमटा काढला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख