निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा केला 'शेंबडा' असा उल्लेख - Nilesh Rane Used Filty Words About Aditya Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा केला 'शेंबडा' असा उल्लेख

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

शिवसेना आणि पक्षाची नेतेमंडळी कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाही, असा टोला महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल कल्याणमध्ये एका कार्यक्रमात विरोधी पक्षांना उद्देशून लगावला होता. कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग च्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली होती. त्याला निलेश राणेंनी उत्तर दिले आहे. 

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधक विकासाच्या कामात करत असलेल्या राजकारणाबद्दल केलेली टीका माजी खासदार निलेश राणे यांना चांगलीच झोंबली आहे. "आला एकदाचा शेंबडा बाहेर. एक पत्रकार परिषद घेऊन दाखव म्हणजे कळेल तू काय आहेस. आता xx कोणाला फरक पडत नाही शिवसेनेचा,'' अशा भाषेत निलेश राणे यांनी आदित्य यांच्यावर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. 

शिवसेना आणि पक्षाची नेतेमंडळी कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाही, असा टोला महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल कल्याणमध्ये एका कार्यक्रमात विरोधी पक्षांना उद्देशून लगावला होता. कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग च्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली होती. त्याला निलेश राणेंनी उत्तर दिले आहे. 

शिवसेनेसाठी राजकारण निवडणुकांपुरते मर्यादित असते. निवडणुका संपल्या की आम्ही आपापल्या भागातील लोककल्याणाची कामे हाती घेतो. काही लोक मात्र अशा कामांमध्ये मुद्दामहून राजकारण करत असतात. अशांना राजकारण करत राहू दे. शिवसेनेसाठी मात्र राजकारण हे निवडणुकांपुरतेच मर्यादित आहे,'' असे राणे म्हणाले होते. 

शिवसेनेसाठी राजकारण हे नेहमी निवडणुकांपुरतं मर्यादित असतं. एकदा निवडणुका संपल्या की आम्ही सारे शिवसैनिक आपापल्या विभागातील लोककल्याणाच्या कामांना सुरूवात करतो. पण काही लोक मात्र मुद्दाम अशा कामांमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांचं राजकारण करत राहू दे. पण शिवसेनेसाठी राजकारण हे केवळ निवडणुकांपर्यंतच मर्यादित आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे राणे यांनी लव जिहादच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनाही फटकारले आहे. ''काँग्रेसवाल्यांनी फालतू बड बड करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना विचारा त्यांना काय वाटतं love jihad बद्दल आणि जर ते विसरले असतील तर ही २०१४ ची त्यांची स्टेटमेंट दाखवा त्यांना.,'' असे ट्वीट राणे यांनी केले आहे. महाराष्ट्रात लव जिहाद सारखा कायदा आणण्याची गरज नसल्याचे वक्तव्य अस्लम शेख यांनी केले होते. त्याला राणे यांनी उत्तर दिले आहे. २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लव जिहादच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता, याची आठवण निलेश यांनी करुन दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख