उद्धव ठाकरे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य नाही..... - Nilesh Rane Hits out at Sanjay Raut over his statement about Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य नाही.....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे

मुंबई : उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करतील आणि देशाचं वाटोळं लावतील, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. 

नाशिक आणि धुळ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मुंबईत संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात लोक येण्यात उत्सुक आहेत आणि येत आहेत. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवस देशाचे नेतृत्व करतील, असे प्रतिपादन राऊत यांनी केले होते. निलेश राणेंनी या वक्तव्याचा आपल्या ट्वीटच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.

चाचणी म्हणून पदवीधर शिक्षक मतदार निवडणुकीत आपण पहिलय.  भाजपची त्या ठिकाणी काय स्थिती होती. हे तीन पक्षांचा सरकार आहे त्यामुळे एका पक्षातून आता इनकमिंग सुरू होणार आहे. नेते येत जात असतात,नेते गेले म्हणून काय झाले कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत,ते सेनेसाठी पाय घट्ट रोवून उभे राहणार आहेत. भविष्यातल्या घडामोडींचे केंद्र सेनाभवन असेल असेही राऊत म्हणाले होते. 

त्यावर ''ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही राऊत निर्लज्जासारखा म्हणतात की सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार,'' अशीही टीका राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. अर्थात ही टीका पूर्णपणे एकेरी भाषेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत या दोघांचाही उल्लेख निलेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये एकरी भाषेतच केला आहे.

Edited By- Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख