..तुला स्टुलावरची नोकरी देतो; वैभव नाईकांना निलेश राणेंचे प्रत्युत्तर - Nilesh Rane Challenges Shivsena MLA Vaibhav Naik | Politics Marathi News - Sarkarnama

..तुला स्टुलावरची नोकरी देतो; वैभव नाईकांना निलेश राणेंचे प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नारायण राणेंना लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर २०१४ ची निवडणूक त्यांनी लढवून दाखवावी, त्यांना पुन्हा एकदा दणदणीत पराभव पाहायला मिळेल, असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी येथे दिले होते. त्याला अरे-तुरेच्या भाषेत निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. 

मुंबई : ''शिवसेना आमदार बैल वैभ्या नाईक म्हणतो राणे साहेबांनी २०२४ ला निवडणुकीला उभे राहवे. उद्धव ठाकरेला सांग एकदा तरी जनतेतून निवडून यायला मग आम्ही सांगतो राणे साहेबांना. वैभ्या तुला २०१४ ला बेरोजगार करणार, तुला स्टूलावरची नोकरी देतो २०२४ नंतर,'' अशा भाषेत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांना आव्हान दिले आहे. 

कोकणात शिवसेना संपवू असे विधान माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केले होते. त्यावर शिवसेना संपवू पाहणाऱ्या नारायण राणेंना सिंधुदुर्गातील जनतेनेच नाकारलेय. त्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा शिवसेना संपविण्याची भाषा करू नये.लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर २०१४ ची निवडणूक त्यांनी लढवून दाखवावी, त्यांना पुन्हा एकदा दणदणीत पराभव पाहायला मिळेल, असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी येथे दिले होते. त्याला अरे-तुरेच्या भाषेत निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. 

''राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना संपविण्याचे आव्हान दिलंय; पण त्यांचे आव्हान आम्ही २०१४ च्या निवडणुकीत स्वीकारलं होतं. यात खुद्द राणेंनाच पराभव झाला. एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाचाही लोकसभा निवडणुकीत आम्ही पराभव केला. जर नितेश राणे भाजपच्या तिकिटावर लढले नसते तर त्यांनाही पराभवाचाच सामना करावा लागला असता,'' असेही नाईक म्हणाले होते. 

''राणेंनी २०१९ ची निवडणूक लढायला हवी होती; पण पुन्हा एकदा पराभव नको म्हणून त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीतून पळ काढला होता. आता आमचे तुम्हाला आव्हान आहे की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला तुम्ही कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढवून दाखवा. त्यावेळी तुम्हाला कळेल की शिवसेनेचे ११ नव्हे तर २१ आमदार निवडून आलेले असतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागेल,'' असा इशारा नाईक यांनी दिला होता. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख