तिकीट न मिळाल्याने बानकुळेंचे मानसिक संतुलन बिघडले; राष्ट्रवादीची टीका - NCP Spokesperson Criticized Chandrashekhar Bawankule | Politics Marathi News - Sarkarnama

तिकीट न मिळाल्याने बानकुळेंचे मानसिक संतुलन बिघडले; राष्ट्रवादीची टीका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

माजी मंत्री बावनकुळे यांनी सरकारमध्ये सर्वप्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यासाठी जिल्हे वाटून घेतल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी उत्तर दिले आहे. सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःला व पत्नीला तिकीट न मिळाल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या अवस्थेत बावनकुळे असावे? म्हणून ते अशी वक्तव्य करत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

मुंबई : फडणवीसांनी कायमस्वरूपी घरी बसवलेल्या बावनकुळे यांनी फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर बेताल वक्तव्य केले आहे परंतु बावनकुळे यांनी याबाबतचे पुरावे द्यावे अन्यथा सरकारची जाहीर माफी मागावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

राज्यात सर्वत्र जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळू चोरी, तस्करी व अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार विदर्भातील आहेत. मात्र विदर्भातही हाच सावळा गोंधळ सुरू आहे. तस्करी व चोरीत थेट सरकारच सहभागी असल्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा प्रशासनाला कारवाई न करण्याचे अलिखित आदेश आहेत. अनैतिकतेतून जन्माला आलेल्या या सरकामध्ये सर्व अवैध कामे सुरू असल्याची टीका बाननकुळे यांनी केली होती

माजी मंत्री बावनकुळे यांनी सरकारमध्ये सर्वप्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यासाठी जिल्हे वाटून घेतल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःला व पत्नीला तिकीट न मिळाल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या अवस्थेत बावनकुळे असावे? म्हणून ते अशी वक्तव्य करत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीही बानकुळे यांनी महाराष्ट्रात आज मोगलाई सुरू आहे, अशी टीका केली होती. ''आजची स्थिती बघून असे म्हणावे वाटते की, मोगल तरी चांगले होते, इंग्रज तरी चांगले होते, दिलेल्या शब्दाला पक्के राहत होते. पण सध्या महाराष्ट्रात मुगल आणि इंग्रजांपेक्षाही वाईट सरकार आले आहे. आधी सांगितले की चार महिन्यांतील वीज बिलांमध्ये आम्ही दुरूस्ती करू, पण काहीही केले नाही. अतिशय वाईट म्हणजे ९६ लाख परिवारांची वीज कापण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता येवढ्या मोठ्या संख्येने घरं अंधारात जाण्याची भिती आहे. सरकारने लॉकडाऊनच्या काळातील बिले कमी करुन दिलेली नाहीत. सरकारने दिलेला शब्द फिरवला आहे,'' असे बावनुकळे म्हणाले होते. 
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख