रुग्णालयातून परतलेले जितेंद्र आव्हाड म्हणतात...चलता रहूंगा पथपर, चलने मैं माहीर बन जाऊंगा!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचारासाठी दवाखान्यात होते. परवा रात्री ते घरी आले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
Dr. Jitendra Awhad Returns from the Hospital
Dr. Jitendra Awhad Returns from the Hospital

पुणे-
चलता रहूंगा पथपर
चलने मैं माहीर बन जाऊंगा
या तो मंजिल मिल जायेगी
या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.....
....असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचारासाठी दवाखान्यात होते. परवा रात्री ते घरी आले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, "गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया. माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये,'' अशी विनंती त्यांनी केली आहे.

 "एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल. या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड शरद पवार, जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे उद्धवजी ठाकरे, सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख ,जयंत पाटील, राजेश टोपे, मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले. माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती." असे आव्हाड यांनी म्हटले आहे. 
या पोस्टच्या शेवटी आव्हाड यांनी...

अपने कदमों के काबिलियत पर 
विश्वास करता हूं , 
कितनी बार तूटा लेकीन 
अपनो के लिये जीता हूं ,

चलता रहूंगा पथपर
चलने मैं माहीर बन जाऊंगा
या तो मंजिल मिल जायेगी
या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा....
......असं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com