....या अभिनेत्रींचे मोबाईल फोन NCB ने केले जप्त - NCB Seized Mobile Phones of Actresses including Deepika Padukone | Politics Marathi News - Sarkarnama

....या अभिनेत्रींचे मोबाईल फोन NCB ने केले जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाॅलीवडू आणि ड्रग कनेक्शन याची चौकशी सुरु आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दीपिका पदुकोनसह अन्य काही अभिनेत्रींचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्जंसदर्भात चॅट केल्याची कबुली दिली. मात्र, ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाॅलीवडू आणि ड्रग कनेक्शन याची चौकशी सुरु आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दीपिका पदुकोनसह अन्य काही अभिनेत्रींचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची काल चौकशी केली. या सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्जसंदर्भात चॅट केल्याची कबुली एनसीबीसमोर दिली आहे. एनसीबीने दीपिकासह श्रद्धा कपूर, सारा अली खान, करिष्मा प्रकाश, रकुल प्रित सिंग, सिमोन खंबाटा आणि जया शहा यांचे फोन ताब्यात घेतले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह परवा चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली.  तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही परवा चौकशी झाली आहे. काल पुन्हा तिची चौकशी झाली आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. दीपिकाची काल सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.  

चौकशीत सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्जंसदर्भात चॅट केल्याची कबुली दिली. मात्र, ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला आहे. या अभिनेत्रींनी केलेले व्हॉट्सअॅप चॅट हे त्यांच्याविरोधात ड्रग्ज घेतल्याचा पुरावा ठरू शकत नाही. यासाठी आणखी ठोस पुरावे एनसीबीला हवे होते. या चौकशीत केवळ सुशांतच्या ड्रग्ज सेवनाचे पुरावे समोर येत आहेत. परंतु, या अभिनेत्रींनी ड्रग्ज सेवन केल्याचे काहीच धागे सापडत नाहीत. यामुळे आता एनसीबीची डोकेदुखी वाढली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख