दीपिका, साराचा डिलीट डेटा मिळवणार; इमेजिंग तंत्राच्या मदतीने डेटा क्‍लोन करणार

एनसीबी या सर्व मोबाईलमधील डाटा क्‍लोनिंग करून डिलीट संदेश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या साह्याने यापूर्वीच चॅट व इतर व्यक्तींसोबत झालेल्या चॅटची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. रियाच्या मोबाईलमधील डाटाही अशाच पद्धतीने मिळवण्यात आला होता
NCB to Recover Delete Data from Deepika and Sara's Mobile Phones
NCB to Recover Delete Data from Deepika and Sara's Mobile Phones

मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक रियाप्रमाणे इतर अभिनेत्रींच्या मोबाईलमधील डिलीट डेटा मिळवणार आहे. त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकूल प्रीतसिंह, सिमोन खंबाटा, करिष्मा प्रकाश आणि जया साहा यांचे मोबाईल फोन एनसीबीने जप्त केले होते. या मोबाईल फोनमधील डाटाच्या आधारे ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या बड्या नावांचाही खुलासा होण्याची शक्‍यता आहे. 

एवढंच नव्हे तर डिलीट केलेला मोबाईलमधील डाटा देखील परत मिळवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिलीय. त्यासाठी सायबर न्यायवैद्यक विभागाची मदत घेण्यात येणार आहे. एनसीबी या सर्व मोबाईलमधील डाटा क्‍लोनिंग करून डिलीट संदेश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या साह्याने यापूर्वीच चॅट व इतर व्यक्तींसोबत झालेल्या चॅटची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. रियाच्या मोबाईलमधील डाटाही अशाच पद्धतीने मिळवण्यात आला होता. यापूर्वी नायरमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातही अशाच पद्धतीचा वापर करून मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेले पुरावे मिळवण्यात आले होते. दहशतवादी, घातपाती कृत्यांमध्ये अशा तंत्राचा सर्रास वापर केला जातो.

अभिनेत्रींच्या दाव्यांची पडताळणी करणार
सामान्यतः कॉपी पेस्ट केल्यामुळे मोबाईलमधील उपलब्ध फाईल्स मिळवता येतात, पण इमेजिंगच्या मदतीने मोबाईल डेटाचे क्‍लोनिंग केल्यास जुन्या डिलीट केलेल्या फाईल्सही मिळवता येतात. त्यामुळे सध्या या अभिनेत्री करत असलेले दावे यांची पडताळणी या डेटाच्या माध्यमातून करणे शक्‍य होणार आहे. तसेच त्यांच्यातील जुने संदेशही मिळवता येतील, असे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी असलेल्या कायदेशीर प्रक्रिया केल्या तर न्यायालयातही असे पुरावे ग्राह्य धरले जातात.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com