अजानवरून शिवसेनेला नवाब मलिक यांचे पाठबळ

शिवसेनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन अजान स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याच्या अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नबाब मलिक यांनी पाठिंबा दिला आहे.
Nawab Malik - Uddhav Thackeray
Nawab Malik - Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन अजान स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याच्या अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नबाब मलिक यांनी पाठिंबा दिला आहे. ग्रामीण भागात गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला असून मंदिरात हिंदू नायकाची भूमिका करणाऱ्या शाहरुख, सलमान यांनी धर्मांतर केले असा अर्थ होत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुळात आपल्या देशाशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही, असेही मलिक यांनी सुनावले आहे. शिवसेनेने ही स्पर्धा आयोजित करण्यास भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. त्यास मलिक यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय काहीही जमत नाही अशी जोरदार टिकाही त्यांनी केली आहे.

देशाच्या संस्कृतीबाबत भाजपचे हे आक्षेप आहेत. मात्र कलेकडे धर्माच्या चष्म्यातून पाहणे याखेरीज अन्य काही लाजीरवाणे होऊ शकत नाही. अशा धार्मिक कार्यक्रमात भाग घेणे म्हणजे तो धर्म स्वीकारणे असा त्याचा अर्थ होत नाही, हे भाजपला कळले पाहिजे, असेही त्यांनी सुनावले आहे.

राज्यात सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता, याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये हिंदू नायकाच्या भूमिका केल्या आहेत. शिवाय त्यांनी मंदिरामध्ये जाऊनही चित्रीकरण केले आहे. याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले आहे असे होत नाही, या सर्व गोष्टी शिवसेनेला विरोध करणाऱ्यांनी समजून घ्याव्यात, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com