राणेंकडे लघु उद्योग, कराडांना अर्थ, पाटलांना पंचायत राज, तर पवारांकडे आरोग्य खाते  - Narayan Rane is the Minister for Micro, Small and Medium Enterprises | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राणेंकडे लघु उद्योग, कराडांना अर्थ, पाटलांना पंचायत राज, तर पवारांकडे आरोग्य खाते 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेले भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री हे महत्वाची खाते आले आहे. कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज्यमंत्री ह्या विभागाची, तर भारती पवार यांना आरोग्य आणि कुटंब कल्याण या मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आलेली आहे. (Narayan Rane is the Minister for Micro, Small and Medium Enterprises)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्य टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (ता. ७ जुलै) सायंकाळी पार पडला. या विस्तारात राज्यातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा : अमित शहा बनले देशाचे पहिले सहकार मंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्य टर्ममधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार आज सायंकाळी पार पडला. या विस्तारात राज्यातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांची खाते काढून घेण्यात आली असून अनेक उलटफेर झाले आहेत. 

या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांच्याकडील मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तसेच, पहिल्या टर्ममध्ये रेल्वेमंत्री असलेले पियूष गोयल यांच्याकडे पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे आता वस्त्रोउद्योग मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रथमच निर्माण करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या हाती ठेवला आहे. त्यामागे सहकारातील साखर लॉबीच्या राजकारणाचा विचार करण्यात आलेला दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख