...म्हणून नंदकिशोर मुंदडा यांनी सुरू केले धरणे आंदोलन 

जिल्ह्याची आरोग्य उपचाराची मोठी मदार असलेल्या येथील एकमेव स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयातील 50 डॉक्‍टकरांच्या मुंबईला प्रतिनियुक्ती करण्यात आल्या आहेत. या विरोधात भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात धरणे धरले आहे.
Nandkishore Mundada's protest in Beed over the deputation of doctors
Nandkishore Mundada's protest in Beed over the deputation of doctors

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढून आता 62 वर पोचली आहे. अशातच जिल्ह्याची आरोग्य उपचाराची मोठी मदार असलेल्या येथील एकमेव स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयातील 50 डॉक्‍टकरांच्या मुंबईला प्रतिनियुक्ती करण्यात आल्या आहेत. या विरोधात भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात धरणे धरले आहे. 

कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात दोन महिने जिल्ह्यात शून्य रुग्ण होते. मात्र, मागच्या पंधरा दिवसांपासून सुरु झालेले कोरोनाचे मीटर थांबायला तयार नाही. मुंबईहून आलेल्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्वच 62 रुग्ण मुंबई रिटर्न आहेत. दरम्यान, कोरोना रुग्ण वाढत असताना आणि जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालयावर उपचाराची मोठी भिस्त असलेल्या येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 50 डॉक्‍टरांच्या मुंबईमध्ये प्रतिनियुक्‍त्या केल्या आहेत. 

प्रतिनियुक्‍त्या प्रस्तावित असताना आमदार नमिता मुंदडा यांनी विरोध करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. दरम्यान, शनिवारी याचे आदेश निघाल्यानंतर त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा समर्थकांसह महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयाबाहेर धरणे धरून बसले आहेत. उन तापत असतानाही फिजिकल डिस्टन्स पाळून आंदोलन सुरुच आहे. 

दरम्यान, देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेले अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय फक्त कोरोना रुग्णांपुरतेच मर्यादीत नसून बीड जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, परभणी येथील गरीब रुग्ण येथे उपचारासाठी येतात. या डॉक्‍टरांच्या प्रतिनियुक्‍त्यांमुळे यंत्रणेवर मोठा ताण पडून उपचारास अडचणी येणार असल्याचे नंदकिशोर मुंदडा म्हणाले. 

अगोदरच येथे डॉक्‍टकरांची संख्या कमी असताना पुन्हा आहे त्यातून डॉक्‍टरांच्या प्रतिनियुक्‍त्या करणे म्हणजे या भागातील गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणे असल्याचा आरोपही नंदकिशोर मुंदडा यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com