सचिन वाझेच्या बडतर्फीची प्रक्रिया सुरु? - Mumbai Police To Dismiss Sachin Waze from Department | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

सचिन वाझेच्या बडतर्फीची प्रक्रिया सुरु?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेला पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे समजते. वाझेला यापूर्वीच खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. 

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेला पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे समजते. वाझेला यापूर्वीच खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. Mumbai Police To Dismiss Sachin Waze from Department

वाझेकडे सध्या वर उल्लेख केलेली दोन्ही प्रकरणे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप या बाबत चौकशी सुरु आहे. वाझेच्या अनेक गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आता अटक केलेल्या रियाज कडून एनआयए माहिती घेत आहेत. वाझेची शेवटची नेमणूक विशेष शाखेत होती. त्यामुळे आता त्या खात्याने त्याच्या बडतर्फीची प्रक्रिया सुरु केली आहे. वाझेशी संबंधित सर्व प्रकरणांची कागदपत्रे या शाखेकडे पाठविण्यात आली असून शाखेने वाझे विरोधातील खातेअंतर्गत अहवालही तयार केल्याची माहिती मिळत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके भरलेल्या स्काॅर्पिओमध्ये सापडलेले धमकीचे पत्र वाझेंनीच लिहिले होते, अशी कबूली त्यांनी एनआयएला दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे. Mumbai Police To Dismiss Sachin Waze from Department

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासात एनआयएने पुरावे म्हणून तब्बल ८०० सीसीटिव्हिंचे फुटेज आतापर्यंत पडताळून वाजे विरोधात ठोस पुरावे ताब्यात घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणात एनआयएने आतापर्यंत चाळीसहून  अधिक जणांचे जबाब नोंदवले असून ८ जणांना साक्षीदार केलं असल्याचे कळते. 

नुकत्याच अटक केलेल्या पोलिस अधिकारी रियाझच्या चौकशीतून या संपूर्ण गुन्ह्यामागचा हेतू काय हे एनआयएचे अधिकारी समजून घेत आहेत. या प्रकरणात रियाजच्या चौकशीतून समोर येणाऱ्या गोष्टींची पडताळणी एनआयएचे अधिकारी करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख