मुंबई पोलिसांनी केले आठ कोटींचे हुक्का फ्लेवर्स जप्त - Mumbai Police Confiscated Hukkah Flavors from Goregaon | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पोलिसांनी केले आठ कोटींचे हुक्का फ्लेवर्स जप्त

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे प्रतिबंधित हुक्का आणला गेला होता.  हा ८ कोटी रुपयांचा प्रतिबंधित हुक्का मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. यात जवळपास ८० पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्क्याचे फ्लेवर्स यात असून गोरेगाव पूर्व भागातून हे हुक्क्याचे फ्लेवर्स जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई : शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे प्रतिबंधित हुक्का आणला गेला होता.  हा ८ कोटी रुपयांचा प्रतिबंधित हुक्का मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. यात जवळपास ८० पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्क्याचे फ्लेवर्स यात असून गोरेगाव पूर्व भागातून हे हुक्क्याचे फ्लेवर्स जप्त करण्यात आले आहेत.

हे साडेतीन टन हुक्का फ्लेवर्स एकावेळेस १ लाख ५० हजार जण घेवु शकतात. हे हुक्का फ्लेवर्स बेकायदेशीर रित्या जयकिशन अग्रवाल याने साठवून ठेवले होते. २३ डिसेंबर २०२० रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व समाजसेवा शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान मुकादम कंपाउंड, जनरल ए. के. वैदय मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी छापा टाकला होता.

या प्रकरणी कुरार पोलीस ठाणे येथे सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (प्रतिबंध) अधिनियम सन २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असूल गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक गुन्हयाचा तपास करीत आहे.

ही कारवाई पोलीस सह आयुक्‍त मिलींद भारंबे आणि अप्पर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोआ संजय पाटील, पोनि पोखरकर व पो. उप. नि. बिपीन चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने केलीये...

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख