धार्मिक स्थळे सुरु करण्याच्या निर्णयाबाबत मुंबई महापौर नाराज? - Mumbai Mayor Questions decision About Reopening of Religious Places | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

धार्मिक स्थळे सुरु करण्याच्या निर्णयाबाबत मुंबई महापौर नाराज?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली; मात्र धार्मिक स्थळांमध्ये होत असलेल्या गर्दीवर मुंबईच्या महापौरांनी प्रश्‍न निर्माण केला आहे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यात गर्दी होत असल्याचे सुचक विधान महापौरांनी केले आहे.

मुंबई  : दिल्लीत कोव्हिडची दुसरी लाट आली असून अहमदाबादमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार दिल्लीतून येणाऱ्या रेल्वे आणि विमान सेवांवर निर्बंध आणण्याचा विचार करत आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नसून त्यावर विचार सुरु असल्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली; मात्र धार्मिक स्थळांमध्ये होत असलेल्या गर्दीवर महापौरांनी प्रश्‍न निर्माण केला आहे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यात गर्दी होत असल्याचे सुचक विधान महापौरांनी केले आहे.

याशिवाय पुढील १५ दिवस दिल्ली, अहमदाबाद मधून येणाऱ्या रेल्वे बंद होण्याची गरज असल्याचे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत, असेही त्यांनी नमुद केले. दिल्लीहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे विमानतळांवर चाचणी करण्याचा विचार सरकार करत आहे. हा अहवाल येई पर्यंत त्यांचे विलगीकरण करण्याचाही पर्याय विचारात आहे .तसेच, दिल्लीहून येणाऱ्या रेल्वेबाबतही विचार सुरु आहे; मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे शेख यांनी सांगितले. 

महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लांब पल्याच्या रेल्वेंमधून कोव्हिडचा संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील कोव्हिड नियंत्रणात आहे. मात्र, अद्याप तो संपलेला नाही. दिल्ली, अहमदाबाद अशा ठिकाणाहून येणाऱ्या रेल्वेमधून कोव्हिडचा प्रसार होऊ शकतो, अशी शक्‍यता नाकारता येत नाही, असे महापौरांनी सांगितले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख