Mumbai Guardian Minister Aslam Shaikh Tested Corona Positive | Sarkarnama

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 जुलै 2020

काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. शेख यांनी काही वेळापूर्वी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. आपणाला कोरोनाची लक्षणे दिसत नसून मी स्वतःला क्वारंटाईन करत आहे,  असे त्यांनी कळवले आहे.

मुंबई : काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. शेख यांनी काही वेळापूर्वी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. आपणाला कोरोनाची लक्षणे दिसत नसून मी स्वतःला क्वारंटाईन करत आहे,  असे त्यांनी कळवले आहे.

माझ्या संपर्कात जे आले त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी सूचना त्यांनी ट्वीटरवरुन केली आहे. आपण क्वारंटाईनच्या काळात घरून कार्यालयीन कामकाज करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

रुपाली चाकणकर यांना कोरोना किंवा अन्य कोणताही गंभीर आजार नसल्याचे डॉक्टर आणि कुटुंबियांकडून सांगण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आगामी दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लॉकडाउनच्या काळात राबविण्यात आलेले उपक्रम नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी चाकणकर यांचा पुढाकार असायचा. पुण्यातील धायरीतील लोकांना मदत करण्यापासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील कुटुंबियांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्या राज्यभर भेटीगाठी घेत होत्या. 

गेल्या तीन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्पुरते उपचार घेण्यात आले. त्यानंतर खबरदारी म्हणून कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याचवेळी त्यांची कोरोनाची चाचणीही करण्यात आली. मात्र कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना कोरोना नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख