परमबीरसिंग पोहोचले एनआयए कार्यालयात; वाझे प्रकरणात चौकशी होणार - Mumbai Ex CP Parambir Singh Reached NIA Office for Probe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

परमबीरसिंग पोहोचले एनआयए कार्यालयात; वाझे प्रकरणात चौकशी होणार

सूरज सावंत
बुधवार, 7 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग काही वेळापूर्वी एनआयए कार्यालात पोहोचले आहेत. सचिन वाझे प्रकरणात एनआयएकडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अँटिलिया बाँब प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग Parambir Singh काही वेळापूर्वी एनआयए कार्यालात पोहोचले आहेत. सचिन वाझे Sachin Waze प्रकरणात एनआयएकडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अँटिलिया बाँब प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. Mumbai Ex CP Parambir Singh Reached NIA Office for Probe

एका बाजूला परमबीरसिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी होणार असली तरीही दुसऱ्या बाजूला परमबीरसिंग यांनाही एनआयएच्या NIA चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. वाझे हे थेट परमबीरसिंग यांना रिपोर्टिंग करत होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात परमबीरसिंग यांची भूमीका काय याबद्दल त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. 

या विषयांवर परमबीर सिंह यांना केले जाऊ शकतात प्रश्न

१) परमबीर सिंह आयुक्त झाल्यानंतर वाजेंची मुंबई पोलिस दलात Mumbai Police  नियुक्ती कुठल्या आधारावर करण्यात आली.

२) सचिन वाझेला कुणाच्या सांगण्यावरून पोलिस दलात घेतले.

३) सर्व महत्वाचे गुन्हे वाझेलाच का?  इतर वरिष्ठ अधिकारी असताना वाझेलाच हा गुन्हा तपासासाठी का दिला.

४) या संपूर्ण गुन्ह्यात वाझेचा सहभाग निश्चित झाल्यानंतरही तातडीने केस का वर्ग केली नाही..  चालढकल पणा का केला...

५) अटकेपूर्वी वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्टिंग करत होता. त्यावेळी तासनतास परमबीर यांची वाझेसोबत बैठक होत होती... या बैठकीत वाझे काय सांगायचा.

६) गुन्ह्यात वाझेचा सहभाग माहिती होता का ?

७) जैश उल हिंद दहशतवादी प्रकरणाची तपासणी खासगी सायबर संस्थेकडून का करण्यात आली.

८) गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिस आयुक्तालयात कशी आली.

९) वाझे इतरांपेक्षा जवळचा का ?

१०) हेमंत नगराळे यांनी पाठवलेला अहवाल याचीही चौकशी होणार.Mumbai Ex CP Parambir Singh Reached NIA Office for Probe

मनसुख हिरेन Mansukh Hiren यांच्या मोबाईलवर आलेल्या तीन व्हॉट्सअॅप कॉलमुळे संबंधित प्रकरणाचा गुंता सोडवण्यात एनआयए तपास यंत्रणेला यश आले आहे. त्यामार्फत पोलिस बुकी नरेश गोर, विनायक शिंदे व सचिन वाझेपर्यंत पोहोचू शकले. हत्येपूर्वी मनसुख हिरेन यांना घरी दूरध्वनी आला होता. त्या वेळी त्यांचा फोन घरी असल्यामुळे वायफायला कनेक्टेड होता. त्यातील डेटाची पडताळणी केली असता तीन क्रमांक गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख