महापारेषण करणार ड्रोनद्वारे वीज वाहिन्यांची देखभाल

दुर्गम भागातून जाणाऱ्या, समुद्रकिनारी व खाडीलगतच्या भागात पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग परिणामकारक रितीने करता येणार आहे. ड्रोनवर व्हिडीओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास येतील. त्यामुळे त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे शक्‍य होणार आहे
MSEDCL to use drones for Maintenance
MSEDCL to use drones for Maintenance

मुंबई  : राज्यातील उच्च दाब वाहिन्यांच्या परिसर आणि टॉवरची गस्त, सर्व्हे आदी कामे ड्रोनद्वारे करण्यास महापारेषण कंपनीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा व मनुष्यबळ वाचणार आहे. महापारेषण ही वीज क्षेत्रात ड्रोनचा वापर करणारी देशातील एकमेव कंपनी ठरली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी महापारेषणला ड्रोन वापरण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी असून एकूण ६८१  ईएचव्ही उपकेंद्रे असून ४८ हजार ३२१  सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या राज्यात आहेत. महापारेषणकडे सध्या १ लाख २७ हजार ९९० एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता आहे. तसेच २५ हजार एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे. 

आता दुर्गम भागातून जाणाऱ्या, समुद्रकिनारी व खाडीलगतच्या भागात पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग परिणामकारक रितीने करता येणार आहे. ड्रोनवर व्हिडीओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास येतील. त्यामुळे त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे शक्‍य होणार आहे. विशेषतः नवीन प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठीही या ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग होणार होऊ शकतो. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनद्वारे तपासणी होत आहे. त्यामुळे हे 'डायग्नोस्टिक टूल' ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्‍य होत आहे. ड्रोन उडविण्याची उंची नियमानुसार  ५० मीटरपर्यंत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com