अडचणीच्या काळात शिवसेनेची खिंड लढवणारे संजय राऊत मुख्य प्रवक्ते

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या प्रवक्‍त्यांची यादी आज (ता. 8 सप्टेंबर) जाहीर करण्यात आली आहे.
MP Sanjay Raut as Shiv Sena's chief spokesperson
MP Sanjay Raut as Shiv Sena's chief spokesperson

मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या साहाय्याने राज्यात शिवसेनेचे सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत येऊन खासदार बनलेले इचलकरंजीचे धैर्यशील माने यांच्याकडेही पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या प्रवक्‍त्यांची यादी आज (ता. 8 सप्टेंबर) जाहीर करण्यात आली आहे. या प्रवक्‍त्यांच्या यादीत चार खासदार, तीन मंत्री, तीन आमदार आणि मुंबईच्या महापौरांनाही संधी देण्यात आली आहे. 

खासदार राऊत यांनी अगोदरही मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहिले आहे. दिल्लीत आणि देशपातळीवरील शिवसेनेची भूमिका ठरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. संसदेतही पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, यावरील निर्णयातही त्यांचा वरचष्मा असतो. याशिवाय राम मंदिराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोध्येचा दौरा केला होता. त्याची आखणीही राऊत यांनीच केली होती. 

भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या साहाय्याने राज्यात सत्ता स्थापन करणास नेतृत्वाला राजी करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची जबाबदारीही राऊत यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. 

शिवसेना, ठाकरे कुटुंबावर होणारे हल्ले परतवून लावण्याचे काम राऊत हे निर्धारपूर्वक करत असतात. आताही सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे कुटुंबाकडे होणारे अंगुलीनिर्देश राऊत यांनी खोडून काढत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. या सर्व कामाची पावती राऊत यांना मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याने मिळाल्याचे बोलले जात आहे. 

खासदार राऊत यांच्या जोडीला इतर दहा प्रवक्‍त्यांची टीम देण्यात आली आहे. राऊत आणि हे दहा प्रवक्ते देश आणि राज्य पातळीवर पक्षाची भूमिका मांडणार आहेत. या यादीचे वैशिष्ट्ये म्हणजे राष्ट्रवादीतून येऊन खासदार झालेले धैर्यशील माने यांना बढती देण्यात आली आहे. 

शिवसेनेचे नवे मुख्य प्रवक्ते आणि प्रवक्ते पुढील प्रमाणे ः मुख्य प्रवक्ते- खासदार संजय राऊत. प्रवक्ते ः खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com