कोरोना रुग्णांसाठी मुंबईत ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे.
 कोरोना रुग्णांसाठी मुंबईत ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरोहाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे.
शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी ही माहिती दिली. 

यासंदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे १२ हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे. 
गोरेगाव येथे २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे.

 महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करम्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होील. त्यापाठोपाठ मुलुंड येथे २००० खाटा, दहीसर येथे २००० आणि भायखळा येथेही २००० खाटांची उभारणी अंतीम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

पालिका आर्थिक संकटात
 मुंबईचा तारणहार ठरलेली महापालिका सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले मुंबईकरांसाठीचे विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता पालिकेला विविध बॅंकांमध्ये ठेवलेल्या ठेवी मोडाव्या लागण्याची शक्‍यता असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

कोरोनापूर्वी मुंबई महापालिका आर्थिक मंदीच्या संकटात होती. कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई महापालिकेला आता कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. विकासकामांना कात्री लावून आर्थिक बजेट रुळावर आणण्यासाठी कसरत पालिकेला करावी लागली. कोरोनामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पालिकेचे मोठे प्रकल्पही रखडले आहेत. 

ते प्रकल्प पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विविध बॅंकांतील पालिकेच्या ठेवी मोडण्याची वेळ पालिकेवर आली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. जीएसटी लागू झाल्यानंतर पालिकेला जकातीतून मिळणाऱ्या सात हजार कोटी रुपयांवर पालिकेला पाणी सोडावे लागले. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर प्रशासनाने भर दिला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com