मोहन चौहाणला अत्यंत तीव्र वेदनादायी जीव जाईल अशी शिक्षा द्यावी

राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी या प्रकरणात सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
मोहन चौहाणला अत्यंत तीव्र वेदनादायी जीव जाईल अशी शिक्षा द्यावी
annasaheb dange.jpg

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे निर्भयेवर बलात्कार झाला होता. त्या पीडित महिलेची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. उपचारा दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. राज्या बलात्काराच्या घटना वाढत आहे. यावर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी या प्रकरणात सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

अण्णासाहेब डांगे म्हणाले, मुंबई, पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरातील  बलात्काराची घटना मन बधीर करणारी आहे. अत्याचार करणाऱ्या नराधम मोहन चौहाणला फाशीची शिक्षा नको. त्याने ज्या प्रमाणे मुलीवर अत्याचार करून वेदना दिल्या. त्यापेक्षा अधिक वेदनादायी शिक्षा द्यावी.

हेही वाचा...

पाशवी अत्याचार करणाऱ्या चौहाणला फाशी द्या अशी सर्वत्र मागणी होत आहे. पण नुसती फाशी देऊन चालणार नाही. कारण आधुनिक फाशीमध्ये संबंधीतास नगण्य वेदना होत असतात. त्या काही सेकंदा पुरत्या असतात. आपण कधीतरी मरणारचं आहोत. या भावनेने पुन्हा पुन्हा असे कृत्य घडते. ही विकृती हद्दपार करण्यासाठी कडक शिक्षा असायलाचं हवी. 

मुंबईत चौहाण सारख्या नराधमाने बलात्कारित मुलीबरोबर अघोरी शारीरिक अत्याचार केले यामुळे "त्या" मुलीला झालेल्या वेदना काय असतील याचे कल्पनाही करू शकत नाही. तिच्या वेदना त्या नराधमास कशा समजणार ? म्हणून "त्या" नराधमाला त्यापेक्षाही दसपटीने तीव्र वेदना होणारी शिक्षा द्यायला हवी. 

हेही वाचा...

बलात्काऱ्यांना अशा शिक्षा होऊ लागल्या तरच महिलांच्या वरील अत्याचाराच्या घटना कमी होतील, अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in