बॉम्बेऐवजी 'मुंबई स्टॉक एक्‍सचेंज' करा; मनसेची मागणी - MNS Wants Renaming of Bombay Stock Exchange | Politics Marathi News - Sarkarnama

बॉम्बेऐवजी 'मुंबई स्टॉक एक्‍सचेंज' करा; मनसेची मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंजचे नाव 'मुंबई स्टॉक एक्‍सचेंज' करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

मुंबई  : मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंजचे नाव 'मुंबई स्टॉक एक्‍सचेंज' करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंज हे आशियाचे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्‍सचेंज करावे. स्टॉक एक्‍सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे. याचे नाव "मुंबई स्टॉक एक्‍सचेंज"च असले पाहिजे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मनसेने मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला आहे. ऍमेझॉन आणि फ्लिप कार्ट कंपन्याचे शॉपिंग ऍप मराठीत करण्यासाठी ही आंदोलन सुरू केले आहे. या मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.

दरम्यान, घाटकोपर पश्‍चिम पारशीवाडी परिसरातील जय महाराष्ट्र गणेश मैदान पालिका शाळेजवळील असलेला स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा फलक काही महिन्यांपासून अडगळीत पडून आहे. त्यासंदर्भात मनसेचे वॉर्ड क्र. 129 चे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी अनेकदा पालिकेच्या विभागीय कार्यालयात पत्रव्यवहार करून चौकाचे पुन्हा सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत दुर्लक्ष होत असल्याने विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली गीते यांच्या नेतृत्वाखाली आज एन वॉर्ड पालिकेतील परिमंडळ १ चे सहायक अभियंता सचिन बेलदार यांच्या दालनासमोर कार्यकर्त्यांनी सावरकर यांचे पोस्टर चिकटवून घोषणाबाजी केली. 

पाऊण तास कार्यकर्त्यानी दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या पुढाकाराने सावरकर चौकाचे मुंबई महापालिकेच्या परवानगीने नामकरण करण्यात आले. मात्र अज्ञाताने फलक उखडून अडगळीत टाकण्याने मनसेने पालिकेकडे सुशोभिकरणाची मागणी केली होती. आजच्या आंदोलनानंतर सचिन बेलदार यांनी दोन दिवसांत चौकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख