निवडणुका जिंकण्यासाठी मनसेची मोठी योजना : राज ठाकरेंचे `चलो अयोध्या`

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार असून आपल्या दौऱ्याचा अहवाल ते राज ठाकरे यांना देणार आहेत. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे
Raj Thackeray to Visit Ayodhya in March
Raj Thackeray to Visit Ayodhya in March

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या १ ते ९ मार्च दरम्यान एक दिवशी अयोध्याला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीनंतर नांदगावकर यांनी ही माहिती दिली. 

आज झालेल्या बैठकीला अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि व अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन मनसेने केल्याचे नांदगावकर यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठीच्या संकल्पनांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.  मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर सुद्धा कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार असून आपल्या दौऱ्याचा अहवाल ते राज ठाकरे यांना देणार आहेत. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार असल्याचे नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.

त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येणार असून राज ठाकरे मुंबई आणि ठाण्यात स्वाक्षरी करण्यासाठी जाणार आहेत. मराठी भाषा शिकवणारे शिक्षक, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मानही मनसेच्या वतीने केला जाणार आहे, असे बाळा नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.

मनसेची सदस्य नोंदणी
९ मार्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन आहे. काही महापालिकांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्या दृष्टीने मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ९ फेब्रुवारी ते १२ एप्रीलपर्यंत मनसेचे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. या सर्वांना महाराष्ट्र सेनिक असे ओळखपत्रही दिले जाईल, असे नांदगावकर यांनी सांगितले. गट अध्यक्षांना 'राजदूत' म्हणून संबोधले जाणार असून त्यांना तसा बिल्ला देण्यात येईल. या व्यतिरिक्त राजकारणापासून बाहेर असलेल्या लोकांनी विकासाबद्दलच्या सूचना कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. अशा सूचना करणाऱ्या नागरिकांना राज यांच्या सहीचे पत्र देण्यात येणार असल्याचे नांदगावकर म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com