योगाभ्यासाने मनसामर्थ्य टिकल्याने आमदार साटम यांची कोरोनावर मात

अंधेरीचे (पश्चिम) भाजप आमदार अमित साटम यांनाही कोरोनाची सौम्य लागण झाली होती, मात्र तशाही अवस्थेत गृहविलगीकरणातही त्यांनी आपला रोजचा अर्धा तासांचा योगाभ्यास प्राणायाम सुरुच ठेवला. त्याच बळावर त्यांचे मनसामर्थ्य टिकून राहिले व त्यांनी कोरोनावर मात केली.
MLA Amit Satam
MLA Amit Satam

मुंबई : अंधेरीचे (पश्चिम) भाजप आमदार अमित साटम यांनाही कोरोनाची सौम्य लागण झाली होती, मात्र तशाही अवस्थेत गृहविलगीकरणातही त्यांनी आपला रोजचा अर्धा तासांचा योगाभ्यास प्राणायाम सुरुच ठेवला. त्याच बळावर त्यांचे मनसामर्थ्य टिकून राहिले व त्यांनी कोरोनावर मात केली.

अन्य लोकप्रतिनिधींप्रमाणे कोरोनाकाळात देखील लोकांच्या मदतीसाठी साटम घराबाहेर पडतच होते. अशातच कोठेतरी त्यांना सप्टेंबर अखेरीस कोरोनाची लागण झाली आणि ते व त्यांची मुलगी कोरोना पॉझिटीव्ह आले. दोघेही लक्षणविरहित (असिंप्टोमॅटिक) कोरोनारुग्ण असल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले. या काळात त्यांनी महापालिकेच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे तसेच व्हिटामिन सी व डी नियमितपणे घेतले, नेहमीचा पौष्टिक आहार सुरुच ठेवल्याने ते दोघेही ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पूर्ण बरे झाले.  

मात्र कोरोनावर मात करण्यात नियमित योगाभ्यास उपयोगी पडला हे साटम आवर्जून सांगतात. ते रोजच अर्धा तास योगाभ्यास, प्राणायाम करतात, त्यामुळे नेहमीच आपले मनसामर्थ्य चांगले रहात असल्याचा अनुभव येतो, असे त्यांचे सांगणे आहे. एरवीही आपण मार्च पासून कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यावर रोज एकदा गरम पाण्याचा वाफारा घेत होतो. कोरोना झाल्यावर मी दिवसातून दोनदा वाफारा घेतला, योगाभ्यास-प्राणायाम देखील सुरुच ठेवला व त्याचा फायदा झाला. मात्र सर्वांनीच कोरोना टाळण्यासाठी काही पथ्ये जरुर पाळावीत, असेही त्यांनी सरकारनामा ला आवर्जून सांगितले.

मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या तर अत्यावश्यक बाबी आहेतच. पण रोज व्हिटामीन सी घेणे, आठवड्यातून एकदा व्हिटामीन डी घेणे, रोजच्या रोज वाफारा घेणे या गोष्टीदेखील जरुर कराव्यात. त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधेही जरूर घ्यावी, असे मला वाटते. यात अश्वगंधा गिलो, कबासुरकुदी ही औषधे कोरोना नसला तरीही सर्वांनी घ्यावीत. या सर्व गोष्टी केल्या तर आपण कोरोनाला नक्कीच परतवू शकतो व त्याचा परिणामही अल्प होईल, असेही साटम म्हणाले.

किंबहुना ज्या असिंप्टोमॅटिक रुग्णांना ताप नसतो त्यांनाही महापालिकेतर्फे असाच उपचार सांगितला जातो. ताप असेल व तब्येत बिघडलेल्यांना रुग्णालयात नेले तरच मोठी औषधे व इंजेक्शने दिली जातात. माझ्या सासुबाईंनाही आमच्याच बरोबर कोरोना झाला होता, पण त्यांचे वय पुष्कळ होते व त्यांची तब्येतही चांगली नसल्याने त्या रुग्णालयात नेऊनही कोरोनाला पराभूत करू शकल्या नाहीत. पण तुम्ही आम्ही सामान्य नागरिक या मार्गाने कोरोनाला नक्कीच पराभूत करू शकतो हे निश्चित, असेही साटम म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com