शिक्षणमंत्री म्हणतात, राज्यात सर्व शाळांत मराठी विषय शिकवा; अन्यथा... 

राज्य अभ्यासक्रमाच्या राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या पहिली ते दहावीपर्यंत मराठीचा विषय अनिवार्य आहे. पण, सीबीएसई, आयसीएसई, आयबी यासारख्या शाळा तसेच केंब्रिज यांसारख्या अन्य मंडळांच्या शाळांतमराठी हा विषय दिला जात नाही. मराठी विषय अनिवार्य नसल्याने अशा शाळांवर निर्बंधही घालता येत नव्हते, त्यामुळे राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांत मराठी विषय अनिवार्य केला आहे.
 Marathi subject compulsory in all schools in the state
Marathi subject compulsory in all schools in the state

मुंबई : राज्य अभ्यासक्रमाच्या राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या पहिली ते दहावीपर्यंत मराठीचा विषय अनिवार्य आहे. पण, सीबीएसई, आयसीएसई, आयबी यासारख्या शाळा तसेच केंब्रिज यांसारख्या अन्य मंडळांच्या शाळांत मराठी भाषा द्वितीय अथवा तृतीय पर्याय म्हणून उपलब्ध असते. बऱ्याच शाळांत मराठी हा विषय दिला जात नाही. मराठी विषय अनिवार्य नसल्याने अशा शाळांवर निर्बंधही घालता येत नव्हते, त्यामुळे राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांत मराठी विषय अनिवार्य केला आहे. 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून (2020-21) करण्यात येणार आहे. या निर्णयाचे कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला. याची अंमलबजावणी टप्याटप्याने होणार आहे. कारवाईचे अधिकार त्या त्या विभागातील शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत. 

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांत मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात सरकारने निर्णय काढला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 2020-21या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. हा अधिनियम यापूर्वीच पारित करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्यात येणार आहे. 
 


या वर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. राज्यात मराठी या विषयाला काही शाळांमधे प्राधान्य नव्हते. काही शाळांत मराठी विषयाकडे दुर्लक्ष केले जायचे. ही बाब ध्यानात घेऊन सरकारने ही सक्ती केली आहे. 

अशी असेल अंमलबजावणी 

राज्यातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्याने मराठी हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी, तर 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी आणि सातवीसाठी, तर 2020-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि आठवीसाठी, तर 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी आणि नववीसाठी, तर 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. 

तामिळनाडू, कर्नाटकच्या धर्तीवर निर्णय 

देशातील इतर राज्यांत म्हणजे तामिळनाडू, तेलंगण, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर 9 मार्च 020 रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम पारित करण्यात आला आहे. त्याला अनुसरून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यात आल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com