मराठा समाजाचा शनिवारपासून पंढरपूर ते मुंबई मोर्चा - Maratha Community Organised from Pandharpur to Mantralaya | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजाचा शनिवारपासून पंढरपूर ते मुंबई मोर्चा

भारत नागणे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा सकल समाजाच्या वतीने सरकार विरोधात पंढरपूर ते मंत्रालय(मुंबई) असा चारशे किलोमीटरचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. ७) दुपारी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेवून मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे.

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा सकल समाजाच्या वतीने सरकार विरोधात पंढरपूर ते मंत्रालय(मुंबई) असा चारशे किलोमीटरचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. ७) दुपारी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेवून मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून सुमारे एक लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत,अशी माहिती सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर(अकलूज) यांनी दिली.

तत्कालीन भाजप सरकाने मराठा समाजाला  शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले होते. परंतु ते आरक्षण  न्यायालयात प्रलंबीत  आहे.  राज्य आणि केंद्र सरकाने तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करुन महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु राज्य आणि केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर नाही. शिवाय राज्य सरकारही हा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरली आहे असा आरोपही श्री,साखळकर यांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षणा मिळवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढण्याची वेळी आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी पंढरपूर येथून मंत्रालयापर्यंत पायी दिंडी आक्रोश मार्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी गावपातळीवर बैठका आणि चर्चासत्र सुुरु आहेत. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणार्या या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या सर्व संघटना  सहभागी होणार आहेत. शनिवारी (ता.4) दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून मोर्च  निघणार आहे. मोर्चामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महेश डोंगरे, सुनिल नागणे, दत्ता मोरे, भगवान माखणे, यांनी  केले आहे.

असा असेल पंढरपूर ते मुंबई मोर्चा मार्ग
पंढरपूर,तोंडले बोंडले, अकलूज,निमगाव केतकी,बारामती, पाटस, यवत, उरळी कांचन,हडपसर, शिवाजी नगर,आकुर्डी,तळेगाव दाभाडे,कामशेत, खोपोली,चौक, पनवेल, नेरुळ, चेंबूर आणि मंत्रालय या मार्गे पायी दिंडी आक्रोश मोर्चा १८ व्या दिवशी मुंबईतील मंत्रालयावर धडक मारणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख