ठाकरे सरकारच्या राज्यात अंधार : किरीट सोमय्यांची टीका

शहर व परिसरात आज वीज पुरवठा खंडित होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार व त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे
Kirit Somaiyya Criticizes Uddhav Thackeray Government over Grid Failure
Kirit Somaiyya Criticizes Uddhav Thackeray Government over Grid Failure

मुंबई : शहर व परिसरात आज वीज पुरवठा खंडित होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार व त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले, ''देखभाल दुरुस्तीच्या कामाचे नीट नियोजन केले जात असल्याने ग्रीड फेल्युअरचा हा प्रकार घडला आहे. त्यातच शंभर युनिट, तीनशे युनिट वीज मोफत देण्याबाबत ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. हो लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय राहणार नाहीत,''

दरम्यान, महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा - पडघा जीआयएस केंद्रात सर्किट देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी सर्व भार सर्किट दोन वर टाकलेला होता. पण त्यात बिघाड झाल्याने मुंबई - ठाण्यातील बहुतांश भागातील वीज गेली आहे, आमचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल, असा दावा राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. 

मुंबईत आज अचानक झालेल्या पावर ग्रिड फेल्युअर मुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा परिणाम रेल्वेसेवेवरती झालेला पाहायला मिळाला. अचानक झालेल्या बत्ती गुल मुळे विरार रेल्वे स्थानकातून मुंबईसाठी जाणाऱ्या लोकल बोरिवलीहून विरार स्थानकात पुन्हा परतत होत्या त्यामुळे मुंबईतील कामाचे ठिकाण गाठण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. शिवाय कोणतीही पूर्वकल्पना नसताना झालेली लोकल बंदमुळे कामगारांची कामावर दांडी लागली.तर अनेक जण मुंबई गाठण्यासाठी रेल्वेस्थानकात बसून आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांंनी याबाबत उर्जा मंत्र्यांशीही चर्चा केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले  उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले.
Editd By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com