पूजा चव्हाणच्या मृत्यूला महत्वाचे वळण; वडिल म्हणाले...

पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यापासून काहीही प्रतिक्रिया न दिलेले तिचे वडिल लहू चव्हाण आज माध्यमांशी पहिल्यांदाच बोलले.
Important turning point in Pooja Chavans death
Important turning point in Pooja Chavans death

परळी वैजनाथ (जि. बीड) : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूला आज महत्वाचे वळण मिळाले. पूजाचा मृत्यू झाल्यापासून काहीही प्रतिक्रिया न दिलेले तिचे वडिल लहू चव्हाण आज माध्यमांशी पहिल्यांदाच बोलले. ''पूजावर आर्थिक ताण होता. तसेच ती सतत आजारी असायची. याच कारणामुळे तिने आत्महत्या केली असावी. माझा कोणावरही संशय नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले आहे. काही अॉडिओ क्लिपही समोर आल्याने भाजपने राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राठोड अडचणीत आले आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. पण या प्रकरणावर अद्याप तिचे वडील काहीही बोलले नव्हते. अखेर आज त्यांनी माध्यमांशी बोलताना आमची नाहक बदनामी थांबवा, असे आवाहन केले.

पूजाच्या मृत्यूसाठी माझा कोणावरही संशय नसल्याचे सांगत ते म्हणाले, पोल्ट्री व्यवसायासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. पण हा व्यवसाय दोन वर्षांपासून तोट्यात आहे. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली. आता बर्ड फ्लूमुळे त्यात आणखी भर पडली आहे. बँकेचे कर्ज कसे फेडायचे, यावरून पूजा तणावाखाली होती. मी तिला ताण घेऊ नकोस, असे सतत सांगायचो. ती सतत आजारीही असायची. याचा ताणही तिच्या मनावर होता. बहुतेक याच कारणांमुळे तिने आत्महत्या केली असावी, असे वाटते. 

पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. ती धाडसी होती. तिच्यावर असलेल्या ताणामुळेच तिने आत्महत्या केली असावी. त्यामागे अन्य कोणतेही कारण नाही. त्यामुळे समाजमाध्यमांनी आमची बदनामी थांबवायला हवी. पोलिसांनाही मी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. चौकशीमधून काय ते पुढे येईलच, असेही लहू चव्हाण यांनी सांगितले. 

पूजाचा मोबाईल अन्य कुणाच्याही हातात जाऊ देऊ नका...

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर एक व्यक्ती तिचा फोन मिळवण्यासाठी धडपडत होती. मात्र, दार बंद असल्याने हा फोन मिळवता आला नाही. हा फोन कुणाला आणि कशासाठी हवा होता, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पूजाचा मोबाईल अन्य कुणाच्याही हातात जाऊ देऊ नका, असे ही व्यक्ती पूजाचा चुलतभाऊ व त्याच्या मित्राला सतत बजावत असल्याचे समोर आले आहे. 

पूजा चव्हाणचा फोन ताब्यात घेण्याचा जो आटापीटा केला जात होता, त्यातून या प्रकरणाचे रहस्य अधिकच वाढले आहे. पूजाचा फोन मिळवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती कोण, तिला हा फोन कशासाठी हवा होता, व पूजाच्या फोनमध्ये नक्की असे काय होते की जेणेकरुन ही व्यक्ती हा फोन दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका, असे बजावत होती, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

पूजा इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रमासाठी पुण्यात आली होती. त्यानंतर ती वानवडी येथील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये तिचा चुलत भाऊ व त्याच्या मित्रासमवेत राहात होती. एक व्यक्ती पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस अगोदर पूजाचा चुलत भाऊ व  त्याच्या मित्राच्या सातत्याने मोबाईलद्वारे संपर्कात होती. त्या व्यक्तीकडून पूजाच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवले जात होते, असे या प्रकरणात व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमधून दिसते आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com