सरकार पाडण्यासाठी मला धमकावले जात आहे; राऊत यांचा खळबळजनक आरोप - I am Threatened By Opponents Claim Shivsena MP Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार पाडण्यासाठी मला धमकावले जात आहे; राऊत यांचा खळबळजनक आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 डिसेंबर 2020

राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार टीकू नये यासाठी गेले वर्षभर मला धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला. आपल्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.

मुंबई : राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार टीकू नये यासाठी गेले वर्षभर मला धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला. आपल्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.

राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना EDची नोटीस आली आहे. त्याबाबत आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद झाली. राऊत म्हणाले, "''गेल्या एक वर्षापासून भाजपचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक सातत्याने मला भेटण्याचा प्रयत्न करताहेत.  त्यांचे सांगणे होते की, आम्ही सरकार पाडायचे ठरवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले सरकार टीकू देऊ नये. गेले वर्षभर मला इशारे दिले जाताहेत. मला वेगवेगळ्या मार्गाने धमकावले. पण मी त्यांचा बाप आहे. मला त्यांनी २२ आमदारांची यादी दाखवली. या सगळ्यांना ईडी व केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेणार आहे,  दबाव आणून राजीनामे घेतली जातील, अशी धमकी दिली,''

राऊत पुढे म्हणाले, "पण सरकार पाडण्याची त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. मग हे सरकार पडणार नाही. म्हणून सरकारच्या खंद्या समर्थकांच्या कुटुंबियांना त्रास द्यायला त्यांनी सुरु केले आहे. त्यांनी तसे खुशाल करावे. वाटेल त्या एजन्सी वापराव्यात. त्यांनी दहशतवादी गँग वापराव्यात. पण आम्ही हटणार नाही. या सरकारचा केसही वाकडा होणार नाही,'' राजकीय भडास काढण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे, विरोधकांना घाबरवण्यासाठी कागदाचे तुकडे घाबरवण्यासाठी पाठवले जात आहेत, अशीही टीका राऊत यांनी केली. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख