Home minister Anil Dehshmukh Took stock of Taj Security | Sarkarnama

त्या फोननंतर ताज हाॅटेल पुन्हा अॅलर्ट वर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

शहरातील हॉटेल ताज या पंचतारांकित हॉटेलला कराचीहून धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हॉटेलच्या सुरक्षेसंदर्भात मुंबईच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काल या हॉटेलला पाकिस्तानातल्या कराचीहून धमकीचा दूरध्वनी आला होता.

मुंबई : शहरातील हॉटेल ताज या पंचतारांकित हॉटेलला कराचीहून धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हॉटेलच्या सुरक्षेसंदर्भात मुंबईच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काल या हॉटेलला पाकिस्तानातल्या कराचीहून धमकीचा दूरध्वनी आला होता. त्या पार्श्वभूमीवर 'ताज'ची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यास सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानात कराची स्टॉक एक्सचेंज वर अतिरेक्यांनी नुकताच हल्ला केला. त्या पार्श्वभूमीवर हा धमकीचा दूरध्वनी अत्यंत गंभीरपणे घेण्यात आला आहे. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याशी तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्याशी चर्चा करून हॉटेलच्या सुरक्षेचा आढावा घेतला. 

'ताज' येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. एकंदरीत संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही अनिल देशमुख यांनी या निमित्ताने सांगितले. मुंबईत २००८ मध्ये अजमल आमिर कसाबसह दहा अतिरेक्‍यांनी दहशतवादी हल्ला केल्यानंतर बारा वर्षानंतर पुन्हा हॉटेल ताजला पाकिस्तानातून धमकीचा फोन आला आहे. ताज हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच पाकिस्तानने २००८ मध्ये ताजला आपले लक्ष्य बनवले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख