राजेश टोपेंचे हॉस्पिटलमधून जनतेला पत्र...आपण समजदार आहात! 

गेली वर्षभरापासून कोरोनाचा विषाणू माझा पाठलाग करत होता.
Health Minister Rajesh Tope wrote a letter to the people of the state from the hospital
Health Minister Rajesh Tope wrote a letter to the people of the state from the hospital

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) राज्यातील जनतेशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर स्वतः कोरोनावर उपचार घेणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही हॉस्पिटलमधूनच जनतेला समजूदारपणा दाखवण्याचे आवाहन केले आहे. 

राज्यभरात थोड्या फार फरकाने सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातही विदर्भातील संख्या लक्षणीय आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत आजपासून बंधने लागू करण्यात आली आहेत. तसेच, लॉकडाउन लावयाचा की नाही, हे जनतेच्या हातात आहे, असे म्हणत ठाकरे यांनी लॉकडाउन संदर्भात अल्टिमेटमही दिला आहे. 

आरोग्य मंत्री टोपे हे स्वतः कोरोनाबाधित असून त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याही परिस्थितीत काळजीपोटी त्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, समजदार, संवेदनशील, सहकार्य करणारे लोक अशी आपल्या राज्याची ओळख आहे. लॉकडाउन टाळणे आपल्याच हाती असून नियमांचे पालन करा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. 

टोपे यांनी पत्रात जनतेला म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. सरकारची खंबीर भूमिका, ठोस उपाय योजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे विशेषतः डॉक्‍टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलिस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहीक लढाई लढावी लागणार आहे. 

मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेली वर्षभरापासून कोरोनाचा विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्याजवळ येणे जमले नाही. पण, अखेर त्याने मला गाठलेच. मात्र, आपल्या सद्‌भावना, प्रेम यामुळे कोरोनाला हरवून मी पुन्हा एकदा कोरोनविरुद्धातील सामूहीक लढाईत मी सहभागी होणार आहे, असा आशावादही त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे. 

समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहील की मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर तंतोतंत पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे आवाहन टोपे यांनी पत्रातून केले आहे. 

शेवटी स्वतःची काळजी म्हणजे कुटुंबातील प्रिय व्यक्तीची काळजी, प्रिय व्यक्तीची काळजी म्हणजेच समाजाची काळजी.  "तेव्हा, चला तर हरवूया कोरोनाला; एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने' असा निर्धारही त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com