सरसकट रेल्वे, लोकलबंदीचा निर्णय आठ दिवसांत घेणार; विजय वडेट्टीवार - Government will decide to shut local trains in next week say Vijay Vadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

सरसकट रेल्वे, लोकलबंदीचा निर्णय आठ दिवसांत घेणार; विजय वडेट्टीवार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनेही काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लॉकडाऊनदरम्यान सुरुवातीला फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवास सुरू केला होता. त्यानंतर बॅंक, सुरक्षारक्षक, वकील, न्यायालयातील लिपिक, शिक्षक, महानगरपालिका कर्मचारी असे विविध घटकांतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली होती.

मुंबई  : दिल्लीनंतर मुंबईतही कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये बाधितांच्या आकडेवारीत वाढ असल्यास आठ दिवसांनंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता रेल्वे, लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे; मात्र कोरोना संक्रमण टक्केवारी आटोक्‍यात असल्यास काटेकोर नियम-अटी आणि शर्थी लावून लोकल परवानगी दिली जाणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनेही काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लॉकडाऊनदरम्यान सुरुवातीला फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवास सुरू केला होता. त्यानंतर बॅंक, सुरक्षारक्षक, वकील, न्यायालयातील लिपिक, शिक्षक, महानगरपालिका कर्मचारी असे विविध घटकांतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली होती.

मुंबईतही लॉकडाऊन?
कोविडची लाट ओसरल्यानंतर सरसकट महिलांनाही नियोजित वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता सरसकट लोकल प्रवासाला मुभा देण्याचा रीतसर प्रस्ताव सरकारने रेल्वेकडे पाठवला; मात्र आता दिल्लीची परिस्थिती बघता मुंबईतही लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते. तसे संकेतही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. रेल्वे आणि सार्वजनिक प्रवासी सेवेवरही लॉकडाऊनचा व्यापक परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख