कोरोनाशी लढताना मृत्यू झालेल्या योद्धांना हुतात्म्याचा दर्जा द्या 

कोरोना सारख्या जीवघेण्या संकटकाळात समाज रक्षणासाठी पोलिस अधिकारी, पोलिस शिपाई, कर्मचारी; तसेच रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. हे सर्व जण कोरोनायोद्धे आहेत.
Give martyrdom status to warriors who died fighting Corona
Give martyrdom status to warriors who died fighting Corona

मुंबई : कोरोना सारख्या जीवघेण्या संकटकाळात समाज रक्षणासाठी पोलिस अधिकारी, पोलिस शिपाई, कर्मचारी; तसेच रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. हे सर्व जण कोरोनायोद्धे आहेत. 

कोरोना विरुद्ध लढताना या योद्धांचा मृत्यू झाल्यास त्यांना हुतात्म्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

कोरोनाविरुद्ध लढताना मृत्यू पावणाऱ्या कोरोना योद्धांच्या कुटुंबीयांपैकी एकाला अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. 


राज्यात 91 हजार रुग्ण कोरोनामुक्त 

मुंबई : राज्यात मंगळवारी (ता. 30 जून) कोरोनाच्या 4878 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात 75 हजार 979 रुग्णांवर (ऍक्‍टीव्ह) उपचार सुरू आहेत. 

मंगळवारी (ता. 30 जून) 951 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 90 हजार 911 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.2 टक्के एवढे कायम आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

मंगळवारपर्यंत (ता. 30 जून) पाठविण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 नमुने पॉझिटिव्ह (18.7 टक्के) आले आहेत. 

राज्यात 5 लाख 78 हजार 33 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
राज्यात मंगळवारी (ता. 30 जून) 245 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 95 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे. 

मागील 48 तासात झालेले 95 मृत्यू हे मुंबई मनपा-36, ठाणे-3, ठाणे मनपा-9, कल्याण-डोंबिवली मनपा- 4, भिवंडी निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-2, नाशिक-2, नाशिक मनपा-1, जळगाव-5, पुणे-1, पुणे मनपा-5, पिंपरी चिंचवड मनपा-3, सोलापूर मनपा-2, कोल्हापूर-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-11, लातूर-1,अकोला-2, अकोला मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे. 

राज्यात मंगळवारी (ता. 30 जून) एकूण नोंदविलेल्या 245 मृत्यूंपैकी 95 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत आणि 150 मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 57, ठाणे मनपा, 15, भिवंडी -42, कल्याण डोंबिवली-2, मीरा भाईंदर -4, ठाणे -3, पालघर -5, पनवेल -7, सोलापूर -6, औरंगाबाद -4, पुणे -3, नाशिक -1 आणि जळगाव -1 यांचा समावेश आहे. हे 150 मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com