माजी न्यायमूर्ती, बॅ. बी. एन. देशमुख यांचे निधन 

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभीमराव नरसिंगराव देशमुख-काटीकर ऊर्फ बी. एन. (वय 85) यांचे गुरुवारी (ता. 28) मध्यरात्री दीडच्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले.
 Former Justice B. N. Deshmukh passes away
Former Justice B. N. Deshmukh passes away

औरंगाबाद ः मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभीमराव नरसिंगराव देशमुख-काटीकर ऊर्फ बी. एन. (वय 85) यांचे गुरुवारी (ता. 28) मध्यरात्री दीडच्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले. 

त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, राज्यसभेचे माजी सदस्य ऍड. नरसिंहराव देशमुख यांचे ते पुत्र, तर माजी खासदार उद्धवराव पाटील यांचे भाचे होत. 

शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली आहे. याचदरम्यान राज्याच्या विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले होते. 

जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड : सुप्रिया सुळे 

माजी न्यायमूर्ती बॅ. बी. एन. देशमुख यांचे निधन झाले. शेतकरी, कष्टकरी व कामगार वर्गाबाबत विशेष आस्था त्यांना होती. त्यांच्या निधनामुळे जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com