File a case against the producer who denied Sushant Singh the film, the BJP MP demanded | Sarkarnama

सुशांतसिंहला चित्रपट नाकारणाऱ्या निर्मात्याविरोधात गुन्हे दाखल करा, भाजपच्या या खासदाराची मागणी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 जून 2020

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी असे म्हटले आहे, की माझी महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी आहे की सुशांतच्या आत्महत्येला जे कोणी निर्माते जबाबदार आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे. 

पुणे : "" ज्या निर्मात्यांनी सुशांतसिंहला चित्रपट नाकारले आणि ज्यांनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घातला होता, अशा निर्मात्यांविरोधात "एफआयआर' दाखल करा अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. 

दुबे यांनी यूपी, बिहार, पूर्वांचल, मध्यप्रदेशमधील होतकरू तरूणांवर कसे अन्याय होतात. मुंबईत गेल्यानंतर त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचा पाढा वाचला आहे. इतक्‍यावरच न थांबता ते म्हणाले, की ज्येष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन सोडले तर या राज्यातील कोणालाही सहजासहजी यश मिळाले नाही. त्यांना संघर्ष करावा लागतो. काहीजणांचे तर करिअर उद्धवस्त झाल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. 

सुशांतसिंह या होतकरू तरूण अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित राहिले आहेत. बॉलिवूडमध्ये कशी घराणेशाही चालते. प्रस्थापित मंडळी गॉडफादर नसलेल्या कलाकारांना कसा त्रास देतात, कसे लक्ष करतात याचे किस्से सांगितले जात आहे.

अभिनेत्री कंगणा राणावत हिने तर सुशांतसिंहने आत्महत्या नव्हे त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. येथे यशस्वी होण्यासाठी कोणता स्ट्रगल करावा लागतो याविषयीही तिने संताप व्यक्त केला आहे. 

सुशांतच्या आत्महत्येने अनेक प्रश्‍न उपस्थित राहिले असताना बॉलिवूडमध्येही आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अभिनेता सैफ अलीखानेही यात उडी घेतली आहे. तर एका निर्मात्याने सलमान खाननेही आपणास कसे देशोधडीला लावले हे सांगितले आहे. एकीकडे हे आरोप होत असताना दुसरीकडे यूपी, बिहारमधील पोरांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न यानिमित्ताने खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. 

खासदार दुबे आपल्या ट्‌विटमध्ये गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "" सुशांतच्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. बॉलिवूडमध्ये सिंडिकेट, गुंड, माफियां आहेत. अशा मंडळींवर कठोर कारवाई व्हायला हवी. पूर्वालचमधील कलाकारांनी आता अशा अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही.'' 

एककाळ असा होता. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याचे बॉलिवूडवर प्रभाव होता. मात्र हा प्रभाव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बॉलिवूडला इडर्स्टीचा दर्जा देऊन ठिकठाक केले होते. पण, आता भलतेच येथे होऊ लागले आहे. येथे घराणेशाही आहे. ही घराणेशाही बाहेरच्या किंवा गॉडफादर नसलेल्यांना टिकू देत नाहीत असेही दुबे यांचे म्हणणे आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख